AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापजनक ! मुक्या जनावरांनाही नाही सोडलं, अंधाराचा फायदा घेत गाईवर ॲसिड हल्ला

पुण्यातून एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. मावळ जवळील एका गावात गाईवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याचा अतिशय संतापनजक प्रकार उघडकी आलाय. मुक्या जनावरावर झालेल्या या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ माजली असून संतापाचे वातावरण आहे

संतापजनक  ! मुक्या जनावरांनाही नाही सोडलं, अंधाराचा फायदा घेत गाईवर ॲसिड हल्ला
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: May 04, 2024 | 9:14 AM
Share

पुण्यातून एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. मावळ जवळील एका गावात गाईवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याचा अतिशय संतापनजक प्रकार उघडकी आलाय. मुक्या जनावरावर झालेल्या या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ माजली असून संतापाचे वातावरण आहे. अंधाराचा फायदा घेत अनोळखी इसमाकडून कान्हे येथे गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ जवळच्या कान्हे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कान्हे गावातील तुषार सातकर या शेतकऱ्याची गाय आहे. पहाटे दूध काढण्यासाठी तुषार सातकर हे गोठ्यात गेले होते. मात्र गोठ्याचे दार उघडताच त्यांना समोर धूर दिसला आणि एकच धांदल उडाली. काय झाले हे पाहण्यासाठी सातकर यांनी पुढे धाव घेतली आणि समोरचं दृष्य पाहून ते हादरलेच. त्यांच्या गोठ्यातील एका गायीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने ती चांगली जखमी झाली. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

समोर असलेल्या 4 शर्यतीच्या बैलजोडी सोबत 10 म्हशी आणि एक गावरान गाय बांधलेली होती. ही गाय गोठ्याच्या दर्शनीय भागत असल्मुळे अज्ञात हल्लेखोराने त्याच्या हातातील ॲसिड गाईच्या पोटावर आणि पायावर टाकले आणि तिला जखमी अवस्थेत सोडून तो तेथून फरार झाला. या हल्ल्यात ती गाय गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुक्या प्राण्यावर या प्रकारे निर्घृण हल्ला कोणी आणि का केला असावा, असाच प्रश्न सध्या सर्वजण विचारत आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?