आई-काकाची हत्या करुन मुलगा दोन दिवस मृतदेहांजवळ बसून, दोनदा आत्महत्येचाही प्रयत्न

'मी आई आणि काकाची हत्या करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र माझा मृत्यू झालेला नाही' असं त्याने फोनवर सांगितलं. तरुणाने स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.

आई-काकाची हत्या करुन मुलगा दोन दिवस मृतदेहांजवळ बसून, दोनदा आत्महत्येचाही प्रयत्न
आई-काकाच्या हत्येनंतर मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गांधीनगर : आई आणि काकाची हत्या केल्यानंतर दोन दिवस मुलगा त्यांच्या मृतदेहांसह घरातच बसून राहिल्याची धक्कादायक घटना अहमदाबाद उघडकीस आली आहे. या काळात त्याने आत्महत्या करण्याचा दोन वेळा प्रयत्नही केला, मात्र तो अयशस्वी झाल्यानंतर मुलाने नातेवाईकांना फोन करुन हत्येची माहिती दिली. आपणही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने नातेवाईकांना सांगितलं.

आई-काकांची हत्या

अहमदाबादच्या इसनपूर भागातील सुमन सजनी सोसायटीत राहणाऱ्या वरुण पांड्याने दुहेरी हत्या केली. ‘मी आई आणि काकाची हत्या करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र माझा मृत्यू झालेला नाही’ असं त्याने फोनवर सांगितलं. वरुणने स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.

बेरोजगारीवरुन कुटुंबाची बोलणी

वरुणच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तो आई आणि काकासोबत एकत्र राहत होता. वरुणला नोकरी नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांकडून वारंवार त्याला बेरोजगारीवरुन बोलणी ऐकून घ्यावी लागत असल्याचं बोललं जातं. याच रागातून त्याने आई आणि काकाची हत्या केल्याचा संशय आहे. हत्येनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांच्या मृतदेहांजवळ वरुण बसून होता.

दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न

या काळात त्याने आत्महत्या करण्याचा दोन वेळा प्रयत्नही केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यामुळे त्याने नातेवाईकांना फोन करुन सांगितलं की ‘मी आई आणि काकाची हत्या करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र माझा मृत्यू झालेला नाही’ त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर दुहेरी हत्येचा प्रकार उघडकीस आला.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांच्या मृतदेहांजवळ वरुण बसून होता. पोलिसांनी जखमी वरुणला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

संबंधित बातम्या :

500 CCTV कॅमेरे, 800 तासांचे चित्रीकरण, 200 जणांची चौकशी, न घडलेल्या बलात्काराचं सत्य ‘असं’ समोर

VIDEO : 20 ते 22 जणांची टोळी, तलवारी आणि कोयत्याने हल्ले, पुण्यात गुंडांचा हैदोस, सीसीटीव्हीत थरार कैद

Published On - 9:48 am, Fri, 20 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI