VIDEO : 20 ते 22 जणांची टोळी, तलवारी आणि कोयत्याने हल्ले, पुण्यात गुंडांचा हैदोस, सीसीटीव्हीत थरार कैद

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण गुंडांचा हातात तलवारी नाचवण्याचा प्रकार बघितला आहे. आपण अनेक चित्रपटांमध्ये एखादी टोळी हातात तलवार किंवा कोयता घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करताना बघितलं आहे.

VIDEO : 20 ते 22 जणांची टोळी, तलवारी आणि कोयत्याने हल्ले, पुण्यात गुंडांचा हैदोस, सीसीटीव्हीत थरार कैद
पुण्यात गुंडांचा हैदोस, सीसीटीव्हीत थरार कैद

पुणे : बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण गुंडांचा हातात तलवारी नाचवण्याचा प्रकार बघितला आहे. आपण अनेक चित्रपटांमध्ये एखादी टोळी हातात तलवार किंवा कोयता घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करताना बघितलं आहे. पण पुण्यात वास्तवात या अशा सिनेस्टाईल दहशत माजवण्याचे प्रकार सर्रासपणे घडताना दिसत आहेत. पुण्याच्या सय्यदनगर परिसरात एका टोळीने तर सर्वच हद्द पार केल्या आहेत. त्यांच्या थैमानाचा पूर्ण प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. गुंडांचा हैदोस माजवतानाचे क्षण सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे या गुंडांना पोलिसांचा काहीच धाक नाही हे त्यांच्या कृत्यातून स्पष्टपणे दिसत आहेत.

पुण्याच्या सय्यदनगर परिसरातील व्हिडीओ समोर

पुण्याच्या सय्यदनगर परिसरात गुंडांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या हैदोसाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हे गुंड कुणालाही पकडून लुटमार आणि मारहाण करतात. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हे गुंड कोयता आणि तलवारी नाचवतात. कुणालाही मारहाण करतात. त्यांचा हा सगळा माज सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला प्रकार हा सोमवारचा (16 ऑगस्ट) असल्याची माहिती आता समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

सय्यदनगरमध्ये गल्ली नंबर 11 आणि 12 मध्ये तसेच रस्त्यावर स्थानिक लँड माफिया गुंडांच्या टोळीने सोमवार रात्री 9.30 च्या सुमारास तलवारी-कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच केला. पुण्याच्या मंगळवार पेठेतील मुजिफ तांबोळी हा तरुण व्यापारी टीव्ही स्पेअर पार्ट्सचे बिल देण्याकरिता परिसरात आला होता. या तरुणाने गुंडांना काहीच केलं नाही. तरीदेखील आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केलं.

विशेष म्हणजे हे गुंड फक्त तेवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी तरुणाच्या जवळील 27 हजारांची रक्कमही हिसकावून घेतली. जवळपास 20 ते 22 जणांची ही टोळी होती. या टोळीने परिसरातील घरांमध्ये शिरुन महिला आणि लहान मुलांनादेखील मारहाण केली.

परिसरातील महिलांचा पोलिसांना आमरण उपोषणाचा इशारा

स्थानिक लँड माफिया गुंडांच्या या माजोरडापणामुळे परिसरातील नागरीक, महिला भयभीत झाले आहेत. त्यांना दररोज अशा गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. या परिसरात गरीब, होतकरु नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांचं हातावरती पोट आहे. गुंड लहान मुलं, वृद्ध आणि महिला असं काहीच बघत नाहीत. ते जो सापडेल त्याला मारहाण करतात. त्यामुळे या सततच्या छळातून हतबल झालेल्या परिसरातील महिलांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई केली नाही तर आमरण उपोषण करु, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे.

घटनेचा थरार बघा :

हेही वाचा :

खंडणीचा हप्ता देण्यास नकार, चाकणमध्ये कोयत्याने वार करत तरुणाचे सोन्याचे दागिने लुटले

पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI