AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यावर हल्ला झाला….तिला आला थेट अंतराळातून कॉल, पुढं घडलं असं काही की सगळेच झाले अचंबित!

एका महिलेसोबत अजब असा प्रकार घडला आहे. मी अंतराळात फसलो आहे. माझ्यावर हल्ला झाला आहे. माझा ऑक्सिजन संपला आहे, असा कॉल या महिलेला आला होता. त्यानंतर घडलेला प्रकार पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

माझ्यावर हल्ला झाला....तिला आला थेट अंतराळातून कॉल, पुढं घडलं असं काही की सगळेच झाले अचंबित!
cyber crime fraud (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Sep 07, 2025 | 6:41 PM
Share

Cyber Fraud : तंत्रज्ञानाचा काही लोक चांगल्या कामांसाठी वापर करतात. तर काही लोक याच तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांची लूट करतात. लुटमारीचे असे अनेक अचंबित करणारे प्रकार आतापर्यंत समोर आलेले आहे. यालाचा कायद्याच्या भाषेत सायबर फ्रॉड असेही म्हटले जाते. सायबर फ्रॉड होऊ नये म्हणून पोलीस नागरिकांना वेळोवेळी आवाहन करत असतात. मात्र असे असूनही अशा प्रकारचे घोटाळे घडतच राहतात. सध्या असाच एक अजब आणि अचंबित करणारा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीची सगळीकडे चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेला समोरच्या व्यक्तीने चक्क अंतराळवीर असल्याचे भासवत लाखो रुपयांना फसवले आहे. फसवणुकीचा हा प्रकार जपानमधील आहे. मी अंतराळयानात फसलो आहे. ऑक्सिजन संपला आहे. मला आणखी ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी पैसे हवे आहेत, असे म्हणत आरोपीने महिलेला फसवले आहे. विशेष म्हणजे सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या या महिलेनेही आरोपीवर विश्वास ठेवून लाखो रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले आहेत.

ऑक्सिजन संपत आला आहे, पैसे पाठव

या घटनेचे वृत्त जपानमधील काही वृत्तपत्रांत छापून आले आहे. याच वृत्तांनुसार पीडित महिला ही नोकरीवरून निवृत्त झालेली आहे. मिळत असलेल्या पेन्शनवर ती तिचा चरितार्थ चालवते. आरोपी आणि या महिलेची ओळख ही सोशल मीडियावर झाली. सोशल मीडियावरच या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने महिलेला मी अंतराळवीर असल्याचे सांगितले. तसेच मी सध्या अंतराळयानात असून पृथ्वीला प्रदक्षीणा घालत आहे. माझ्या अंतराळयानावर हल्ला झाला आहे. माझ्याजवळ असलेला ऑक्सिजन संपत आला आहे. नवा ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी मला काही पैशांची गरज आहे, असे आरोपीने या महिलेला सांगितले. आरोपीने महिलेला एकूण 10 लाख येन (सहा लाख रुपये) पाठव अशी विनंती केली. विशेष म्हणजे महिलादेखील त्याच्या जाळ्यात फसली. महिलेने त्याला ऑनलाईन पद्धतीने हे सगळे पैसे पाठवले.

फसवणूक झाल्याचे समजताच महिलेची पोलिसांत धाव

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी केली असता महिला संबंधित आरोपीवर भाळली असल्याचे समोर आले. याच प्रेमापोटी महिलेने आरोपीला पैसे पाठवले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर आता काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. अंतराळवीर कसा आपल्याला बोलू शकतो? अंतराळातून अशा प्रकारे सोशल मीडियावर बोलणे शक्य आहे का? असे प्रश्न संबंधित महिलेला का पडले नाहीत, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. तर पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच तो कचाट्यात सापडेल अशी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा