AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटातली नस, छातीचं हाड तोडलं, सुंदर बायकोनं नवऱ्यालाच संपवलं; मुंबईतला हादरवून टाकणारा कांड!

मुंबईत विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने एका महिलेने आपल्याच पतीला अत्यंत भयाकन पद्धतीने संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला अमानुष मारहाण केली. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोटातली नस, छातीचं हाड तोडलं, सुंदर बायकोनं नवऱ्यालाच संपवलं; मुंबईतला हादरवून टाकणारा कांड!
mumbai goregaon crime news
| Updated on: Aug 12, 2025 | 9:57 PM
Share

Mumbai Crime News : मुंबईत विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने एका महिलेने आपल्याच पतीला अत्यंत भयाकन पद्धतीने संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला अमानुष मारहाण केली. तसेच रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरातच त्याला डांबून ठेवले. यातच प्रकृती खालावल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे (35) हिचा तिचा पती भरत लक्ष्मण अहिरे यांच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. राजश्री अहिरे यांचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. याच कारणामुळे विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने राजश्री आणि चंद्रशेखर यांनी भरतला संपवण्याचा कट रचला. ठरल्यानुसार 15 जुलैच्या रात्री चंद्रशेखरने भरतला गोरेगाव पूर्वेतील एका ठिकाणी बोलावले. दोघांनीही चंद्रशेखरच्या भावाच्या मदतीने भरतला मारहाण केली. त्यानंतर भरत यांना रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपी पत्नी त्यांना घरी घेऊन गेली. आरोपी महिलेने आपल्या पतीला तीन दिवस उपचाराशिवाय ठेवले. यातच भरत यांची प्रकृती खालावत गेली. पती मराला ठेपला आहे, हे माहिती असूनही पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केले नाही. परिणामी यातच अखेर भरत यांचा मृत्यू झाला.

मुलीला मारून टाकण्याची धमकी

विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर निर्दयी पत्नी राजश्री अर्धमेल्या भरत यांना सतत धमकी देत होती. तुला मारहाण झाल्याचे कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांनाही मारून टाकीन असं राजश्री भरत यांना सांगायची. पत्नीकडून मिळणारी धमकी आणि झालेली मारहाण यामुळे भरत यांची प्रकृती जास्तच खालावली. पुढे 16 जुलै रोजी भरत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पाच शस्त्रक्रिया केल्या पण…

भरत यांना वाचवण्यासाठी पाच ऑपरेशन्स करण्यात आले. मात्र ते वाचू शकले नाहीत. त्यांचा 5 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आरे पोलिसांनी खून आणि खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करून पत्नी राजश्री आणि आरोपी रंगाला अटक केली आहे. तर प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे.

मुलीने सांगितली सगळी हकिकत

भरतची 12 वर्षांची मुलगी श्रेयाने पोलिसांना सांगितले की, आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले. जिथे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने भरतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे तुटली आणि यकृताचे खूप नुकसान झाले, यातच भरत यांचा पुढे मृत्यू झाला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.