आठवी पास, पाच भाषांवर कमांड; हातोहात ठकवणारा मिस्टर नटरवलाल अखेर पोलिसांच्या जाळ्यात

राजेंद्रच्या तक्रारीनंतर सायबर सेल एक्सपर्टने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. हा तपास सुरू असताना आरोपी जामताडा येथे राहत असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी जामताडाला जाऊन आरोपीला अटक केली.

आठवी पास, पाच भाषांवर कमांड; हातोहात ठकवणारा मिस्टर नटरवलाल अखेर पोलिसांच्या जाळ्यात
आठवी पास, पाच भाषांवर कमांड; हातोहात ठकवणारा मिस्टर नटरवलाल अखेर पोलिसांच्या जाळ्यातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 8:46 AM

इंदौर: शिक्षण इयत्ता आठवी पास… एकूण पाच भाषांवर कमांड… फक्त एक फोन करायचा. आपण क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटचे (credit card department) अधिकारी आहोत असं सांगायचा. नंतर ग्राहकांना एक लिंक पाठवून त्यांच्याकडून ओटीपी मिळवायचा आणि ग्राहकाचं अकाऊंट खाली करायचा… बंगळुरूत राहणाऱ्या एका मिस्टर नटरवलालच्या या कारनाम्यामुळे बंगळुरूच (bengaluru) नाही तर मध्यप्रदेशचे पोलीसही (police) हैराण होते. अखेर या ठकसेनाला मध्यप्रदेशच्याच इंदौर पोलिसांनी अटक केली आहे. इंदौरच्या सायबर सेल पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली याचाही तपास सुरू आहे. एका पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर त्याला जामताडा येथून ताब्यात घेतलं आहे.

राजेंद्र डेनवाल असं या पीडित व्यक्तीचं नाव आहे. त्याने इंदौरच्या सायबर सेल पोलिसांना त्याच्या फसवणुकीची तक्रार दिली. राजेंद्रचं क्रेडिट कार्ड चालत नव्हतं. त्याचवेळी त्याला एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटचा अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याने राजेंद्रला त्याची समस्या विचारली आणि त्याची अडचण सोडवण्याचं आश्वासनही दिलं. त्यानंतर त्याने राजेंद्रला एक लिंक पाठवली आणि त्याच्याकडून ओटीपी नंबर मिळवला. ओटीपी नंबर येताच या मिस्टर नटवरलालने राजेंद्रच्या दोन वेगवेगळ्या खात्यातून दोन लाख रुपये काढून घेतले. जेव्हा खात्यातून पैसे काढल्या गेल्याचा मेसेज आला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं राजेंद्रला समजले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

जामताडातून अटक

राजेंद्रच्या तक्रारीनंतर सायबर सेल एक्सपर्टने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. हा तपास सुरू असताना आरोपी जामताडा येथे राहत असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी जामताडाला जाऊन आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला इंदौरला आणण्या आलं. पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपलं नाव अतुल राणा असल्याचं सांगितलं. तो जामताडा येथील रहिवासी आहे. तो आठवी पास असून त्याला पाच भाषा येतात. त्याची अजूनही चौकशी सुरू असून आणखी काही फ्रॉडची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

मित्रांच्या मदतीने फसवणूक

आरोपी अतुल राणा हा खेडे गावात राहतो. बंगळुरूला जाऊन आपल्या मित्रांच्या मदतीने तो लोकांची फसवणूक करायचा. त्यामुळे त्याच्या मित्रांच्याही मुसक्या आवळण्याची सायबर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत कुणाकुणाला फसवलं, त्याचीही माहिती घेण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.