तुझ्यावर ‘रॉ’ची नजर आहे, पुण्यातील तरुणीला 10 लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या

अश्विनी सातव डोके

| Edited By: |

Updated on: Jul 10, 2021 | 8:30 AM

अमेरिकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी आरोपीने तरुणीला केली होती. 'रॉ' या तपास संस्थेची नजर असल्याची भीती दाखवत त्याने तरुणीकडून 10 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

तुझ्यावर 'रॉ'ची नजर आहे, पुण्यातील तरुणीला 10 लाखांचा गंडा, बारामतीतून तरुणाला बेड्या
प्रातिनिधिक फोटो

Follow us on

पुणे : ‘रॉ’ संस्थेची (RAW) भीती दाखवून तरुणीकडून 10 लाख रुपये उकळल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईटवर झालेल्या ओळखीनंतर तरुणाने तक्रारदार तरुणीकडून पैसे उकळले. (Baramati Man dupes Pune Girl of 10 lacks by threatening in name of RAW agency)

‘रॉ’ची नजर असल्याची भीती

अमेरिकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी आरोपीने तरुणीला केली होती. ‘रॉ’ या तपास संस्थेची नजर असल्याची भीती दाखवत त्याने तरुणीकडून 10 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 28 वर्षीय धनश्री हासे या तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बारामतीच्या तरुणाला अटक

चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 30 वर्षीय अमित अप्पासाहेब चव्हाण असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यात बारामती एमआयडीसी परिसरात राहतो. एका सोशल नेटवर्किंग साईटवर आरोपी आणि फिर्यादी तरुणी या दोघांची ओळख झाली होती

सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख

एप्रिल ते 7 जुलै दरम्यान ‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून त्याने तरुणीकडून 10 लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला गजाआड केले. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

57 जणींना गंडवणारा भामटा पुण्यात जेरबंद

दुसरीकडे, सोशल मीडियाद्वारे तरुणींना भुरळ पाडून ओळख वाढवायची, त्यांना लग्नाचं आमिष दाखवायचं आणि त्यांच्या नात्यातील तरुणांना लष्करात भरती करण्याचं आमिष दाखवून लुटायचं, अशाप्रकारे तब्बल 57 जणींना गंडा घालणाऱ्या ‘दादल्या’ला पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चार जणींसोबत घरोबा करुन आर्थिक लूट केल्याचे, तर तब्बल 53 तरुणींशी लग्नाचे आमिष दाखवून बोलणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या भावाची लष्कर भरती करतो, 57 जणींना गंडवणारा ‘दादला’ पुण्यात अटकेत

(Baramati Man dupes Pune Girl of 10 lacks by threatening in name of RAW agency)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI