डेटिंग अ‍ॅपवर हेरायचे सावज, भेटायला बोलावून तरुणांची लूट, सराईत टोळीतील गुंडाला अखेर अटक

पोलिसांनी आरोपींकडून नऊ मोबाईल फोन, दुचाकी, बंदुक आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिस आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

डेटिंग अ‍ॅपवर हेरायचे सावज, भेटायला बोलावून तरुणांची लूट, सराईत टोळीतील गुंडाला अखेर अटक
डेटिंग अॅपवरुन मैत्री करुन तरुणांना लुटणारा आरोपी

लखनौ : दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये रविवारी दुपारी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. कोतवाली सेक्टर 58 पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने ब्ल्यूड या डेटिंग अ‍ॅपद्वारे (Blued App) तरुणांशी मैत्री करुन त्यांना लुटल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी आरोपींकडून नऊ मोबाईल फोन, दुचाकी, बंदुक आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिस आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. कोतवाली सेक्टर 58 पोलिसांना अशी माहिती मिळाली होती, की या परिसरात लूटमार आणि दरोडा घालण्यासाठी निष्णात गुन्हेगार येणार आहेत. पोलिसांना अशीही माहिती मिळाली होती की, ब्ल्यूड अॅपच्या माध्यमातून हे बदमाश तरुणांशी मैत्री करतात, त्यांना भेटायला बोलावून लुटतात, तसेच पादचाऱ्यांकडून मोबाईल फोन आणि सोनसाखळीही हिसकावतात.

पोलिसांशी चकमक, आरोपीच्या पायाला गोळी

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी सुरू केली. बाईकस्वार दोघा तरुणांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दोघेही तरुण पळून जाऊ लागले. त्यांनी आरोपींचा पाठलाग केला, तेव्हा त्यांनी गोळीबार केला. जेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळी झाडली, तेव्हा ती एकाच्या पायाला लागली. जखमी होऊन तो बाईकवरुन खाली पडला. तर दुसरा आरोपी घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेला आरोपी आशु जाट टोळीतील दीपांशु असल्याचे सांगितले जात आहे.

डेटिंग अॅपवरुन तरुणांशी मैत्री

आरोपीकडून लुटीचे नऊ मोबाईल फोन, एक दुचाकी, एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या जखमी आरोपीला तातडीने नोएडा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्ल्यूड अॅपच्या माध्यमातून या गँगच्या सदस्यांनी तरुणांशी मैत्री केली आणि त्यांना घटनास्थळी भेटायला बोलावले. नंतर ते त्यांच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर वस्तू लुटत असत. यासोबतच हे दरोडेखोर पादचाऱ्यांचे मोबाईल फोन आणि सोनसाखळीही हिसकावून जात होते.

अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी यासंदर्भात सांगितले की, जखमी आरोपी दीपांशू हा आशु जाट टोळीचा सक्रिय सदस्य आहे, ज्याने आपल्या साथीदारासह एनसीआरसह आसपासच्या भागात दरोड्यासह अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करत आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

पिंपरीतील कुख्यात रावण टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या, साताऱ्यातून सहा जणांना बेड्या

महाराष्ट्र बंदवेळी शिवसैनिकांची रिक्षा चालकाला मारहाण, ठाणे उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI