न्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, तरुणांना फसवणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना अटक

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 22, 2021 | 3:17 PM

आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊण्टवर मुलीच्या नावाने बनावट अकाऊण्ट ओपन करत असत. त्यावरुन सावज हेरुन न्यूड व्हिडीओ कॉल करुन रेकॉर्ड करत

न्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, तरुणांना फसवणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांना अटक
उत्तर प्रदेशात तिघा विद्यार्थ्यांना अटक
Follow us

लखनौ : मुलीच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट उघडून सेक्सटॉर्शन (Sextortion) करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यूड चॅटचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत टोळीतील सदस्यांनी अनेक पुरुषांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी अटक केलेल्या या आंतरराज्य टोळीतील तिघेही सदस्य विद्यार्थी आहेत. आरोपींनी यूपीसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही नेटिझन्सची लूट केल्याचा संशय आहे. (Uttar Pradesh Crime Sextortion Men blackmail in Honey Trap Nude Video threaten by Engineering Students Gang)

फेक अश्लील व्हिडीओद्वारे आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याची तक्रार 19 मे रोजी अलिगढ विद्यापीठातील प्राध्यापकाने सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांकडे दिली होती. प्राध्यापकाकडून या टोळीने तीन लाखांची लुबाडणूक केली होती, तसंच आणखी पैशांची मागणी केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी कलम 384, 419, 420 आणि आयटी अॅक्ट 66D,66E अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

चैनीसाठी लूट केल्याची कबुली

झाशीतून ही टोळी गुन्हे करत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी अशफाक खान, मोहम्मद जावेद खान आणि मोहम्मद शोएब यांना बेड्या ठोकल्या. तिघा आरोपींकडून मोबाईल, चेकबूक आणि इतर सामुग्री जप्त करण्यात आली आहे. तिघांनी आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्याची माहिती दिली. चैनीसाठी ही लूट केल्याची कबुली त्यांनी दिली. देशाच्या वेगवेगळ्या भागातील अनेक जणांकडून लाखो रुपये लुटल्याचंही आरोपींनी सांगितलं.

काय होती मोडस ऑपरेंडी?

आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊण्टवर मुलीच्या नावाने बनावट अकाऊण्ट ओपन करत असत. त्यावर मुलींचे अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो शेअर केले जात. त्यानंतर सावज हेरुन पुरुषांशी अश्लील चॅट करत व्हॉट्सअॅप नंबर मागून घेतला जात असे. हळूहळू व्हिडीओ कॉलला सुरुवात करुन त्यावर न्यूड व्हिडीओ चॅटची मागणी केली जात असे.

सावज जाळ्यात फसलं, की अश्लील व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ रेकॉर्ड करुन धमकावण्यास सुरुवात केली जात असे. आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल केलं जात असे. त्यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली जात असे. काही वेळा आपण आयटी हेड किंवा सोशल मीडिया मॅनेजर असल्याची बतावणी केली जात असे, जेणेकरुन लोक पैसे ट्रान्सफर करतील.

संबंधित बातम्या : 

फेसबुकवरुन ओळख, हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तरुणीची मुंबईत गळा दाबून हत्या

नग्न व्हिडीओ फेसबुक फ्रेण्ड्सना पाठवण्याची धमकी, पुण्यात 150 हून अधिक तरुण जाळ्यात

(Uttar Pradesh Crime Sextortion Men blackmail in Honey Trap Nude Video threaten by Engineering Students Gang)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI