Pune Crime |पुण्यात भरदिवसा गोळीबार ; 6 गोळ्या झाडत तरुणाची केली हत्या

समीर चौकात उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी समीरवर गोळीबार केला. अत्यंत जवळून समीर वर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळाबारात समीर गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Pune Crime |पुण्यात भरदिवसा गोळीबार ; 6 गोळ्या झाडत तरुणाची केली हत्या
samir manoor

पुणे – शहरात गंभीर गुन्ह्यांचे सत्र सातत्याने सुरूच असून, शहरातीलाभारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भरदिवसा तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेतील मृत तरुणाला ६ गोळ्या घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समीर मणूर(वय 40  )असं मृत व्यक्तीच नाव आहे. या घटनेची तातडीने दखल घेत विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.

अशी घडली घटना शहारातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हददीतील चंद्रभागा चौकात हा गुन्हा घडला आहे. मृत समीर चौकात उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी समीरवर गोळीबार केला. अत्यंत जवळून समीर वर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळाबारात समीर गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटना स्थळावर हजर झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. भरदुपारी घडलेले या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

घटनेनंतर परिसरात मोठयाप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकातील वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरु केले आहे. मृत समीर आहे काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

क्रिप्टो करन्सींच्या दरामध्ये घसरण, ‘असे’ आहेत नवीन दर

Nashik| नाशिक जिल्ह्यात 402 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

Aurangabad: शेकटा परिसरात तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त, ट्रकचा पाठलाग करून कारवाई, दोघांना अटक

Published On - 1:53 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI