क्रिप्टो करन्सींच्या दरामध्ये घसरण, ‘असे’ आहेत नवीन दर

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. क्रिप्टोचे दर घसरल्यामुळे मार्केट कॅप देखील कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत मार्केट कॅपमध्ये 1.07 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, सध्या क्रिप्टो मार्केट 2.27 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.

क्रिप्टो करन्सींच्या दरामध्ये घसरण, 'असे' आहेत नवीन दर
बिटकॉईन
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 1:38 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. क्रिप्टोचे दर घसरल्यामुळे मार्केट कॅप देखील कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत मार्केट कॅपमध्ये 1.07 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, सध्या क्रिप्टो मार्केट 2.27 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. एकीकडे क्रिप्टोच्या इतक करन्सीमध्ये घट होत असताना दुसरीकडे मात्र बिटकॉईनचे दर वधारले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये बिटकॉईनच्या दरामध्ये जवळपास 0.42 टक्क्यांची वाढ झाली असून, दर प्रति बिटकॉईन 49,084.94 डॉलरवर पोहोचले आहेत.

बिनान्स, सोलानाच्या दरात घसरण 

बिटकॉईनपाठोपाठ दुसरी महत्त्वाची क्रिप्टो करन्सी असलेल्या बिनान्स आणि सोलानाच्या दरामध्ये घसरण झाली आहे. बिनान्सचे दर तब्बल 3.11 टक्क्यांनी घसरले असून, ते प्रति बिनान्स  545.71 डॉलरवर पोहोचले आहेत. तर सोलानाच्या दरामध्ये 1.55 टक्क्यांची घट झाली आहे. सोलानाचे दर प्रति सोलाना 192.74 डॉलरवर पोहोचले आहेत. मात्र दुसरीकडे इथेरियमचे दर वधारले असून, त्याच्यामध्ये 0.55 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या त्याचे दर प्रति इथेरियम 4,141.51 डॉलरवर पोहोचले आहेत.

देशात क्रिप्टो करन्सीबाबत संभ्रम 

मध्यतंरी भारतामध्ये क्रिप्टो करन्सीला अधिकृत परवानगी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र आरबीआयने क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीबाबत चिंता व्यक्त केल्याने सरकार अद्याप कुठल्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचू शकलेले नाही. क्रिप्टोला देशात परवानगी मिळावी का? याचा सल्ला घेण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने सरकारकडे आपला अहवाल सादर केला आहे.  देशात क्रिप्टोवर पूर्णपणे बंधने घालता येणार नाहीत, मात्र त्याचे नियमन केले जाऊ शकते असे या अहवालामध्ये म्हटले आहे. दरम्यान या अहवालानंतर आता सरकार क्रिप्टो करन्सीला परवानगी देऊन, त्याच्यावर भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयचे नियंत्रण प्रस्थापित करू इच्छित आहे. तसा प्रस्ताव कदाचित सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या 

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

900 कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी काढले कंपनीतून, झुमवर सांगितले आज तुमचा शेवटचा दिवस

अखेर प्रतिक्षा संपली; 15 डिसेंबरपासून होणार ओला ई-स्कूटरचे वितरण

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.