AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुख्यात गुंड कपिल सांगवान याचा व्यावसायिकाला धमकीचा फोन, तब्बल इतक्या कोटींची मागितली खंडणी!

धमकीचा कॉल कपिल सांगवान या कुख्यात गुंडाने दिली असल्याची माहिती मिळाली आहे. व्यावयिकाला व्हाट्सअॅप कॉल आला होता. खंडणी दिली नाहीतर घरच्यांची हत्या करण्याची धमकीही दिली आहे.

कुख्यात गुंड कपिल सांगवान याचा व्यावसायिकाला धमकीचा फोन, तब्बल इतक्या कोटींची मागितली खंडणी!
क्षुल्लक कारणातून दोन कुटुंबात हाणामारी
| Updated on: Jun 26, 2023 | 8:04 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात खंडणी मागण्याचे प्रमाण वाढत आहे. काही गुन्हेगार धमकी देवून, भिती दाखवून खंडणी मागतात. तर काही प्रकरणात सेक्सटॉर्शन, सायबर क्राईम, ब्लॅकमेलिंग, किडनॅपिंग अशा वेगवेगळ्या पध्दतीने खंडणी उकळून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रकार घडत असतात. अशातच ही नवीन घटना घडली आहे. दिल्लीतील पीतमपुरा भागातील एका व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकीचा कॉल आला आहे. खंडणी दिली नाहीतर घरच्यांची हत्या करण्याची धमकीही दिली आहे. हा धमकीचा कॉल कपिल सांगवान या कुख्यात गुंडाने दिली असल्याची माहिती मिळाली आहे. व्यावयिकाला व्हाट्सअॅप कॉल आला होता.

व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात जावून एफआयआर नोंदवली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे व्यावसायिकाला व्हाट्सअॅप कॉल आल्याचं सांगितलं. समोरून कुख्यात गुंड कपिल सांगवान बोलत असल्याचं सांगितलं गेलं. यावर व्यावसायिकाने घाबरुन फोन ठेवून दिला. यानंतर वॉट्अॅपवर व्हाईस कॉल आला त्यात, 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली. व्यावसायिकाचा मॅकॅनिकल इंस्ट्रुमेंटचा व्यवसाय आहे. तो पत्नी, मुलगा, सून आणि 2 वर्षांचा नातू पीतमपुरा येथे राहतात. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुन्हा नोंदवला असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

भारतात एक्सटॉर्शनचे गुन्हे वाढत असून, काही दिवसांआधी दिल्लीच्याच एका व्यावसायिकाला लॉरेंस बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा खंडणी मागण्याचासाठी कॉल आला होता. गॅंगस्टर गोल्डी बरार याच्यावरही आरोप आहेत. प्रसिध्द गायक हनी सिंह यालाही काहीदिवंसाआधी धमकीचा कॉल आला होता.

ऑनलाइन फ्रॉड घटनांमध्ये वाढ 

दरम्यान, आता डिजीटल क्रांती झाल्यामुळे या  घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्यासाठी नवीन टेक्नोलॉजी  फायदेशीर असली तरी त्याचा फटाका सर्वांना बसत आहे. त्यासाठी सर्वांनी जागृक व्हायला हवं आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करताना विचार करून क्लिक करा. नाहीतर तुमचं बँक अकाऊंट खाली व्हायला जास्त वेळ लागणार नाही.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.