तू लड़की के चक्कर में बर्बाद हो जाएगा… अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करणाऱ्या हल्लेखोराला बहिणींनी आधीच केले होते सावध ?

दिल्लीत एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने तिचं डोकं दगडानेही ठेचलं. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तू लड़की के चक्कर में बर्बाद हो जाएगा... अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करणाऱ्या हल्लेखोराला बहिणींनी आधीच केले होते सावध ?
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 1:49 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत (delhi) एका अल्पवयीन मुलीच्या खुनाचे (murder) लाईव्ह फुटेज समोर आल्याने मोठी खळबळ माजली होती. यामुळे सर्वजण भयभीत झाले. हल्लेखोर तरुणीवर चाकू आणि दगडाने वार करत होता आणि आजूबाजूला असलेले लोक केवळ बघ्याची भूमिका घेऊन उभे होते. निष्पाप मुलीवर हल्ला होत असताना सर्वजण फक्त बघत होते, कोणीच त्या हल्लेखोरोला थांबवायचा किंवा त्या मुलीला वाचवायचा प्रयत्नही केला नाही. हत्येनंतर तो पळून गेला होता. अखेर पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी, साहिलला अटक केली. त्याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून पकडण्यात आले आहे.

ही हत्येची घटना घडवून आणणारा हल्लेखोर साहिल कोण आहे ते जाणून घेऊया. साहिलला, त्याच्या बहिणींनी काही महिन्यांपूर्वीच सल्ला दिला होता की, “मुलीच्या प्रेमात तू उद्ध्वस्त होशील, तिला सोडून निघून जा.” मात्र आता त्याच साहिलने त्या मुलीवर चाकूने वार करून तिची हत्या केली.

बुलंदशहर येथून हल्लेखोराला झाली अटक

शाहबाद डेअरी परिसरात घडलेल्या घटनेमुळे त्या मुलीच्या घरात गोंधळाचे वातावरण आहे. त्याचवेळी आरोपी साहिलच्या घरातील सर्वांनाच धक्का बसला आहे. साहिल आणि मुलीमध्ये अफेअर चालू आहे हे साहिलच्या घरातील सर्वांनाच माहीत होते. पण नातं बिघडल्यावर साहिल त्या मुलीलाच मारून टाकेल, एवढ्या टोकाला पोहोचेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. साहिलला अखेर अटक करण्यात आली आहे. हत्या झालेल्या शाहबाद डेअरी पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी याची पुष्टी केली.

मुलीपासून दूर हो, कुटुंबासाठी चांगलं ठरेल

दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी, साहिलच्या दोन बहिणींनी त्याला (भाऊ साहिल) या मुलीपासून (साहिलची मैत्रीण) लवकरात लवकर दूर जावे, असा सल्ला दिला होता. शाहबाद डेअरी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी आणि साहिलच्या कुटुंबीयांमधील संभाषणातून हे देखील समोर आले की साहिलच्या बहिणींनी भावाला समजावून सांगितले की तो जितक्या लवकर मुलीपासून दूर जाईल तितके साहिलचे स्वतःचे आणि कुटुंबाचे चांगले होईल.

साहिल 2-3 वर्षांपासून तरुणीसोबत लिव्ह-इनमध्ये होता

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतरही साहिल २-३ वर्षांपासून तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. साहिलने दोन्ही बहिणींचे ऐकले नाही, त्याचा परिणाम आज समोर आहे. वाईट संबंधांमुळे साहिलने स्वतःच त्या मुलीची हत्या करून स्वतःला उद्ध्वस्त केले आहे. त्याच्या बहिणी त्याच मुलीपासून अनेक महिन्यांपूर्वी साहिलला दूर राहण्याचा सल्ला देत होत्या.

वडील चालवतात वेल्डिंगचं दुकान

साहिल आणि मुलीच्या नात्याबद्दल बहिणींना नक्की काय वाटले, ज्यामुळे त्यांनी साहिलला मुलीपासून ताबडतोब वेगळे होण्याचा सल्ला दिला? असे विचारले असता कुटुंबीय काहीही बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे शाहबाद डेअरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. तो व्यवसायाने फ्रीज मेकॅनिक आहे, तर वडील सरफराज वेल्डिंगचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलच्या डोक्यावर साक्षीच्या मैत्रीचे भूत होते, की तो कुटुंबापासून दूर राहण्यास तयार झाला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.