AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्ह इन पार्टनरसोबत रात्रभर जोरदार पार्टी, त्यानंतर… श्रद्धा वालकर सारखं हत्याकांड; दिल्ली पुन्हा हादरली

दिल्लीतील मुनीरका परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडात एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आहे. आरोपी जगमिनथांगने चारित्र्याच्या संशयावरून 27 वर्षीय लहिंग या महिलेवर हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. हे प्रकरण शहरात एका नवीन दहशतीचं रूप निर्माण करत आहे.

लिव्ह इन पार्टनरसोबत रात्रभर जोरदार पार्टी, त्यानंतर... श्रद्धा वालकर सारखं हत्याकांड; दिल्ली पुन्हा हादरली
CrimeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 13, 2025 | 1:15 PM
Share

दिल्लीत श्रद्धा वालकर सारखं हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने लिव्ह इनमधील पार्टनरची हत्या केली. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील मुनिरका परिसरातील एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून 27 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात राहणाऱ्या जगमिनथांग याला अटक करण्यात आली आहे. ही महिलाही मणिपूरच्या चुराचांदपूर येथील राहणारी असून लहिंग जनेंग असं तिचं नाव आहे.

या हत्याकांडाबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. 8 एप्रिल रोजी दुपारी 1.57 वाजता पोलीस कंट्रोल रुमला फोन आला. मुनिरकाच्या क्रांती चौकात एका मेडिकल स्टोअर जवळ मृतदेह पडल्याचं संबंधित व्यक्तीने सांगितलं. त्यामुळे आमची एक टीम घटनास्थळी तातडीने गेली. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका खोलीत महिलेचा मृतदेह पडलेला होता, असं पोलिसांनी सांगितलं.

वाचा: सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्…

सोमवारी रात्री ही महिला आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यात इतर तीन लोकही सामील झाले होते. कपगौलाल, नेमनेथेम आणि किमनेथेम या पार्टीत हजर होते. पार्टी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. त्यानंतर हे लोक निघून गेले. त्यानंतर रात्री जगमिनथांग आणि लहिंग यांच्यात वाद झाले. किशनगड येथील एका व्यक्तीशी लहिंगचे संबंध असल्याचा आरोप जगमिनथांग करत होता. त्यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. या वादातूनच त्याने लहिंगवर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

मारहाणीमुळेच मृत्यू

निरीक्षणाच्यावेळी मृतदेहावर व्रण असल्याचं दिसून आलं. क्राईम आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पाहणी केली. सफदरजंग रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. शरीरावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळेच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी तोंडी सांगितलं. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर अधिक माहिती मिळेल, असं पोलिसांनी सांगितलं.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

सोमवारी पार्टीत हजर असलेल्या लोकांच्या माहितीनुसार, लहिंगवर दोन दिवसांपूर्वी शारीरिक हल्ला करण्यात आला होता. पार्टीवेळी तिला धमकावण्यात आलं होतं. मेडिकल लिगल केस रिपोर्टच्या आधारे, भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही आरोपीला पकडले आहे. त्याची कसून चौकशी करताना त्याने आधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण अधिक कसून चौकशी करण्यात आली, तसेच तांत्रिक विश्लेषम केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका