AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग, छेड काढून पसार होणारा नराधम सापडला

दिंडोशी पोलिसांनी अटक केलेल्या 30 वर्षीय सिरीयल मॉलेस्टरच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Dindoshi Police arrest serial molester from Pawai)

तब्बल 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग, छेड काढून पसार होणारा नराधम सापडला
| Updated on: Dec 16, 2020 | 7:25 PM
Share

मुंबई: मुंबई पोलिसांनी एका अशा आरोपीला अटक केली आहे. ज्याने जवळपास पन्नास पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. मालाड पूर्वमध्ये दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय सिरीयल मॉलेस्टरच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला 2011मध्ये एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या शिक्षेपासून त्याने काहीच धडा घेतला नाही. या नराधमाने 50 जवळपास महिलांचा विनयभंग केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कबुली दिली आहे. (Dindoshi Police arrest serial molester from Pawai)

चार दिवसांपूर्वी12 डिसेंबर रोजी दिंडोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनयभंगाचा गुन्हा घडला होता. ज्यामध्ये आरोपीने एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करत तिथून पळून काढला होता. तरुणीच्या तक्रारी नंतर दिंडोशी पोलिसांनी महिलेसोबत छेडछाड (354) आणि धमकावणे (506) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर पोलिसांचे एक विशेष पथक नेमण्यात आले. सर्वात आधी सर्व सीसीटीव्हीची पाहणी या पथकाने सुरू केली. यानंतर 2017 मध्ये पवईत असाच एक गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या गुन्ह्यातील आरोपीची सर्व माहिती पवई पोलीस स्टेशनमधून घेऊन दिंडोशी पोलीस आरोपी कल्पेश देवधर च्या घरी पोहोचले आणि त्याला अटक केले. (Dindoshi Police arrest serial molester from Pawai)

अनेक गुन्ह्यात मोस्ट वॉंटेड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कल्पेश देवकर हा ड्रायव्हर असून चारकोप येथील रहिवासी आहे. एखादा गुन्हा केल्यानंतर कल्पेश वारंवार आपला पत्ता बदलायचा. मुंबईमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये कल्पेशवर विनयभंग,अपहरण असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. ज्यात त्याला अटक ही झाली होती. तर असेही काही गुन्हे आहेत ज्यामध्ये कल्पेश देवधर हा वॉन्टेड आहे. कल्पेश देवधर 13 जुलै 2017 रोजी पवई हिरानंदानी येथे कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे करून फरार झाला होता.

कल्पेश देवधर हा त्याच्या आई आणि तीन बहिणी सोबत मालाड येथे राहायला होता. मात्र, कल्पेशच्या या सवयीमुळे आणि वारंवार गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीमुळे कुटुंबातले लोक त्याच्यापासून दूर राहू लागले. देवधरवर विनयभंग मारामारी किडनॅपिंग आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत सुमारे 50 महिलांचा विनयभंग केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. मात्र, बहुतांश प्रकरणामध्ये पीडित महिलांकडून तक्रार करण्यात आली नाही आहे.म्हणून जर कोणी या आरोपीकडून पीडित असेल तर त्यांनी पोलिसांत येऊन तक्रार करावी, असं आवाहन दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश फड यांनी केले आहे. (Dindoshi Police arrest serial molester from Pawai)

संबंधित बातम्या:

नागपुरात माजी सैनिकाच्या घरी दरोडा, रोख रकमेसह पिस्टल लंपास केल्यानं खळबळ

रेखा जरे हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठेला मोठा धक्का; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.