4 लग्न, 12 पुरुष, शारीरिक संबंध, 8 कोटींचा व्यवहार, डॉक्टर-पोलीस कोणीच तिच्या मोहातून सुटलं नाही, समोर आलं धक्कादायक सत्य
एका प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. या महिलेच्या मोहातून कोणीच सुटलं नाही. आता तो पैसा हडपून दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवतोय असा दिव्यांशीने आरोप केलेला. पोलिसांनी तपास केला, तेव्हा सत्य भलतच निघालं.

एका महिलेने चार लग्न केली. 12 पेक्षा अधिक पुरुषांना आपल्या जाळ्यात फसवलं. ब्लॅकमेलिंग करुन कोट्यवधी रुपये उकळले. पोलीस अधिकाऱ्यापासून डॉक्टर तिच्या जाळ्यात अडकले. या महिलेचं नाव दिव्यांशी चौधरी आहे. पोलीस तिची चौकशी करतायत. उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिसांनी या लुटेरी दुल्हनला अटक केली आहे. दिव्यांशी खूप चलाख आहे. ती आधी पुरुषांशी मैत्री करते. मग त्यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवते. लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवते. मग, अचानक बलात्काराचा आरोप करुन खोटा FIR नोंदवते. पीडित घाबरुन तोडजोडीचा फॉर्म्युला समोर ठेवतो. त्यावेळी ती त्याच्याकडून घसघशीत रक्कम वसूल करते. अशा प्रकारे तिने पोलीस, बँक अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवलय.
दिव्यांशीच्या 10 बँक खात्यात मागच्या काही वर्षात 8 कोटी रुपयापेक्षा अधिकचा व्यवहार झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या पैशांचा काही भाग मेरठ झोनमधील पोलीस अधिकारी, एक इंस्पेक्टर आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर करण्यात आला. यावरुन स्पष्ट होतं की, दिव्यांशी हे सर्व एकटी करत नाही. तिचं एक नेटवर्क आहे. ती फक्त लुटेरी दुल्हन नाही, तर ब्लॅकमेलिंग करुन वसुली करणारी गँग आहे.
तेव्हा सत्य भलतच निघालं
अलीकडेच दिव्यांशीने कानपूरचे पोलीस कमिश्नर अखिल कुमार यांच्याकडे पोलीस अधिकारी आदित्य लोचन याची तक्रार केलेली. तिने तक्रारीत आदित्यशी लग्न झाल्याचा दावा केला. आता तो पैसा हडपून दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवतोय असा दिव्यांशीने आरोप केलेला. पोलिसांनी तपास केला, तेव्हा सत्य भलतच निघालं. आदित्यने सांगितलं की, लग्न झाल्यापासून दिव्यांशी त्याला वेगवेगळ्या मार्गाने पैसे देण्यासाठी भाग पाडत होती. अनेकदा त्याला धमकवायची.
चार लग्न केली आहेत
तपासात समोर आलं की, दिव्यांशीने याआधी सुद्धा दोन बँक मॅनेजराना अशाच खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवलं होतं. FIR नोंदवून ती तिच्या सावजाला जेलची धमकी द्यायची. मग तडजोडीच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळायची. तिच्या अकाऊंटमध्ये सापडलेल्या रक्कमेवरुन ती गेल्या अनेक वर्षांपासून हा खेळ खेळत असल्याचं स्पष्ट होतं. दिव्यांशी आतापर्यंत डझनभर लोकांना फसवलय. चार लग्न केली आहेत. सध्या दिव्यांशीला कानपूर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या सगळ्या नेटवर्कचा वेगाने तपास सुरु आहे.
