AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Raghuvanshi Murder : तू फक्त राजाला घेऊन ये.. सोनम आणि राज कुशवाहचं फूलप्रूफ प्लानिंग उघड

Sonam Raghuvanshi-Raj Kushwaha : राजा रघुवंशीच्या मर्डर केसमध्ये, त्याची पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराचे कॉल रेकॉर्डिंग आता समोर आले आहे. यामध्ये राज आणि सोनम जे काही बोलले आहे, तो त्यांच्याविरुद्धचा एक महत्वाचा पुरावा ठरणार आहे.

Raja Raghuvanshi Murder : तू फक्त राजाला घेऊन ये.. सोनम आणि राज कुशवाहचं फूलप्रूफ प्लानिंग उघड
सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचं फूलप्रूफ प्लानिंग उघड Image Credit source: TV9 bharatvasrh
Updated on: Jun 16, 2025 | 1:53 PM
Share

हनीमूनला गेल्यावर गायब झालेला इंदौरमधील राजा रघुवंशी याच्या खळबळजनक हत्येचे प्रकरण आता जवळ पास उलगडलं आहे. मात्र तरीही या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. शिलाँग पोलिसांच्या सांगण्यानुसार, राजाची पत्नी सोनम, हिचा प्रियकर राज कुशवाहा हाच या हत्येचा सूत्रधार होता. सोनम ही यामध्ये त्याची भागीदार असून तिने त्याला पुरेपूर साथ दिली. पोलिसांनी सर्व आरोपींना नेऊन सीन रिक्रिएट केला असता एक मोठा खुलासा झाला. सोनम आणि मारेकऱ्यांनी केवळ 18 मिनिटांतच हे हत्याकांड घडवल्याचे समोर आले आहे. एवढंच नव्हे तर सोनम आणि राज यांचं जुनं चॅट रेकॉर्डिंग हे शिलाँग पोलिसांच्या हाती लागलं असून त्यात सोनमचा आवाजही स्पष्ट ऐकू येतोय.

या कॉल रेकॉर्डिंग आणि चॅटिंगवरून राज आणि सोनमचे हेतू स्पष्टपणे दिसून येतात. राजने चॅटिंगमध्ये लिहिले होतं की, जर तो ( राजा) हटला तर सगळं काही सोपं होईल. तर पुढे सोनमने लिहिलं की मग आपण दोघे पुन्हा एकत्र असू. हे चॅडिंग आणि कॉल रेकॉर्डिंग, हा पुरावा न्यायालयासाठी महत्त्वाचा आहे. पोलिस ते पुरावे आरोपपत्रात जोडणार आहेत.

सगळं ठरलंय, फक्त त्याला घेऊन ये

या व्हायरल झालेल्या चॅटमध्ये राज- सोमनचा संवाद आहे. – काहीही काळजी करू नकोस, सगळं वेळेवर होईल. सगळं काही निश्चित ठरलंय, तू (सोनम) फक्त त्याला (राजाला) घेऊन ये, असं राजाने सोनमला उद्देशून लिहीलं. मेघालयमध्ये आपण सगळं आपल्या पद्धतीने हाताळू. आणि जे काही करायचे असेल तेही बघून घेऊ. तिथे कोणीही आपल्यावर शंका घेणार नाही, असंही त्याने लिहीलं.

त्यावर सोनमने रिप्लाय दिला – मलाही तेच हवे आहे. हे सर्व झाल्यावर आपण शांतपणे राहू.

त्यानंतर दोघांनी कॉलवरही तेच सांगितले. हा कॉल उघडकीस आल्यानंतर राजाच्या कुटुंबाचे दुःख आणखी वाढले आहे. आता संशयाला काही वावच नाही, असं राजाच्या भावाचं म्हणणं आहे. दरम्यान आता हेच रेकॉर्डिंग पोलिसांसाठी तपासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

18 मिनिटांत खेळ खल्लास

राज कुशवाह, सोनम रघुवंशी, विशाल उर्फ ​​विक्की चौहान, आनंद कुर्मी, आकाश राजपूत हे आरोपी शिलाँग पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्या चौकशीदरम्यान दररोज नवीन खुलासे होत आहेत. जेव्हा पोलिसांनी त्यांना गुन्ह्याच्या ठिकाणी नेले आणि त्यांना क्राईम सीन रिक्रिएट ( पुन्हा करायला लावलं) तेव्हा त्यांनी राजाची हत्या दुपारी 2 ते 2:18 च्या दरम्यान, म्हणजे फक्त 18 मिनिटांत केल्याचे उघड झाले. मात्र, सोनम आणि राज यांनी हत्येची सुपारी दिल्याचे वृत्त मात्र फेटाळलं आहे.

मैत्रीसाठी तिघांनी दिली राजची साथ

आरोपी राजच्या सांगण्यानुसार, विशाल, आनंद आणि आकाश या तिघांनी मैत्रीसाठी राजची (हत्येत) साथ दिली. तसेच आता नुकताच एक ऑडिओ व्हायरलझाला असून तो राज आणि सोनम यांचा असल्याचे बोलले जात आहे. या ऑडिओमध्ये तिसरं नावं आनंदचं असून तो या खून प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. हत्येपूर्वी आनंदला संशय आला होता की तो पकडला जाऊ शकतो. त्यामुळे त्याने आधीच त्याचा फोन बंद केला होता.

फक्त घाबरवायचं होतं, मारायचं नव्हतं… सोनमची सारवासारव

शिलाँग पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंग ऐकवून राजची चौकशी केली. आत्र राजाला मारण्याचा आपला हेतू नव्हता तर त्याला फक्त घाबरवायचं होतं असे त्याने सांगितलं. मग त्यांनी त्याला दरीत का फेकलं? हे विचारल्यावर मात्र राज गप्प बसला. मग तो म्हणाला की तो एक अपघात होता. शिलाँग पोलिसांनी जेव्हा सोनमची चौकशी केली, तेव्हा ती रडू लागली. मला राजाला मारायचं नव्हतं, फक्त घाबरवायचं होतं. राजा घाबरून घटस्फोट घेईल, असं वाटलं होतं, असा दावा तिने केला.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.