एनसीबीच्या कोठडीत असणारा एजाझ खान कोरोना पॉझिटिव्ह; अधिकाऱ्यांचाही कोरोना टेस्ट होणार

एजाझ खानला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. | Ajaz khan NCB

एनसीबीच्या कोठडीत असणारा एजाझ खान कोरोना पॉझिटिव्ह; अधिकाऱ्यांचाही कोरोना टेस्ट होणार
एजाझ खान कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: ड्रग्ज रॅकेटप्रकरणी अमली नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आलेला अभिनेता एजाझ खान (Ajaz khan)हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. (Actor Ajaz khan found coronavirus positive)

एनसीबीने बुधवारी एजाझ खानला अक केली होती. तेव्हापासून त्याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, यादरम्यान एजाझ खानची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. काल रात्री या चाचणीचा अहवाल आला. त्यामध्ये एजाझ खानला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाचा तपास करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्या संपर्कात असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी केला जाणार आहे.

ड्रग्ज प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर एजाझ खानला अटक

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान (Ajaz Khan) याला अटक केली होती आणि आता कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. 30 मार्चला एजाझ खान राजस्थानमधून मुंबईत परतला होता. त्यावेळी पोलिसांनी एजाझला ताब्यात घेतले. त्यावेळी एनसीबीने एजाजच्या अंधेरीतील घरावरही छापा टाकला होता.

घरावर टाकलेल्या छाप्याच्या दरम्यान 4 झोपेच्या गोळ्या सापडल्या होत्या. मात्र, आपली पत्नी या गोळ्यांचे सेवन करत असल्याचे एजाझने म्हटले होते. गर्भपात झाल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि म्हणूनच ती यातली एक गोळी दररोज घ्यायची, अशी माहिती एजाझ खान याने न्यायालायात दिली होती.

हेही वाचा :

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

शादाब बटाटाने तोंड उघडलं, NCB ने बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन उचललं

अभिनेता एजाझ खान भायखळ्यातून वारिस पठाण यांच्याविरोधात रिंगणात

(Actor Ajaz khan found coronavirus positive)

Published On - 10:13 am, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI