AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता एजाज खान भायखळ्यातून वारिस पठाण यांच्याविरोधात रिंगणात

बिग बॉसमध्ये झळकलेला एजाज खान अनेक वेळा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने तुरुंगवारीचाही अनुभव गाठीशी घेतलेला आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप एजाजवर आहेत

अभिनेता एजाज खान भायखळ्यातून वारिस पठाण यांच्याविरोधात रिंगणात
| Updated on: Oct 07, 2019 | 9:15 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक सेलिब्रिटींनीही उडी घेतली आहे. बॉलिवूड अभिनेता एजाज खान याने मुंबईतील भायखळा मतदारसंघातून (Ajaz Khan Vs Waris Pathan) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ‘एमआयएम’ने तिकीट नाकारल्यामुळे एजाजने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अभिजीत बिचुकले, दीपाली सय्यद, आनंद शिंदे यासारख्या अभिनेते-गायकांची नावं आतापर्यंत विधानसभा निवडणुकांसाठी चर्चेत होती. यामध्ये आता भर पडली आहे ‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाज खान याची. आपण अपक्ष म्हणून भायखळ्यातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती एजाजने ट्विटरवरुन दिली आहे.

‘एमआयएम’च्या तिकीटावर एजाज खान निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र ‘एमआयएम’चं तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाचे मुंबईतील एकमेव आमदार असलेल्या वारिस पठाण (Ajaz Khan Vs Waris Pathan) यांनाच एजाजने चॅलेंज दिलं आहे.

कोण आहे एजाज खान?

बिग बॉसमध्ये झळकलेला एजाज खान अनेक वेळा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने तुरुंगवारीचाही अनुभव गाठीशी घेतलेला आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप एजाजवर आहेत. टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून धार्मिक तेढ पसरवल्याच्या आरोपातून त्याने तुरुंगवारी भोगली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

एजाजने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ‘एमआयएम’ची डोकेदुखी वाढवल्याचं म्हटलं जात आहे. भायखळा हा मुस्लिमबहुल भाग आहे. या मतदारसंघावर ‘एमआयएम’चा कब्जा आहे. मात्र एजाजही रिंगणात उतरल्यामुळे मुस्लिम मतं विभागली जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

तीन दिवसात आमदाराची पलटी, राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा शिवसेनेत परतणार?

भायखळ्यातून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी, माजी नगरसेविका यामिनी जाधव शिवसेनेच्या तिकीटावर नशीब आजमावत आहेत. तर अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे तिरंगी होणारी ही लढाई चौरंगी होणार का, हा प्रश्न आहे.

विधानसभा निवडणुकांच्या रिंगणातील सेलिब्रिटी

अभिजीत बिचुकले : ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले याने थेट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वरळीमधून बिचुकलेने उमेदवारी अर्ज भरला आहे. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बिचुकलेला किती मतं पडणार, याची उत्सुकता आहे. बिचुकलेने याआधी उदयनराजेंकडून अनेक वेळा पराभवाची धूळ चाखली आहे.

दीपाली सय्यद : गेल्या वेळी ‘आप’च्या तिकीटावर अहमदनगरमधून निवडणुकांच्या रिंगणात उतरलेली मराठमोळी अभिनेत्री दीपाली सय्यद यावेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघातून तिने थेट राष्ट्रवादीचे बडे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज दिलं आहे. दीपालीला यंदा शिवसेनेचं पाठबळ असल्यामुळे ही लढत तुल्यबळ होण्याची चिन्हं आहेत.

आनंद शिंदे : आपल्या रांगड्या आवाजात उभ्या महाराष्ट्राला दणाणून सोडणारे लोकगीत गायक आनंद शिंदेही सोलापूर जिल्ह्यातून नशीब आजमावणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.