AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karad News : मद्यधुंद महिलेचा नशेत भररस्त्यात धिंगाणा, गाडीच्या बॉनेटवर बसूनच..

महाराष्ट्रातील कराड-पाटण महामार्गाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात रस्त्याच्या मधोमध एक महिला गोंधळ घालताना, गाड्या थांबवून त्यांच्या टपावर बसून गोंधळ माजवताना दिसली. तिच्या या कृतीमुळे वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती.

Karad News : मद्यधुंद महिलेचा नशेत भररस्त्यात धिंगाणा, गाडीच्या बॉनेटवर बसूनच..
| Updated on: Nov 26, 2025 | 10:02 AM
Share

मद्य किंवा दारू पिणं हे आपल्य शरीरासाठी अत्यंत घातक आहे, हे सर्वांना माहीत असतं, तरीही हल्ली बरेच लोक दारू पितात, रेग्युलरली मद्यपानम करतात. आणि तीच दारू जास्त झाली किंवा चढली की मग सुरू होतो गोंधळ, आपण कुठे आहोत,काय करतोय याची शुद्ध नसलेले लोकं सरळ हंगामा करायला लागतात. येणाऱ्या-जाणाऱ्या बघ्यांची लाईन लागते आणि अनेकांना त्रासही होतो, पण दारू पिणारे लोकं काही ऐकत नाहीत. असाच एक हंगामा नुकताच राज्यातील कऱ्हाड जिल्ह्यातील कऱ्हाड-पाटण महामार्गावर घडला आहे. तिथे एका मद्यधुंद महिलेने रात्री उशीरा भररस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घातला. तिच्या या गोंधळामुळे अख्ख्या रस्तायवर खळबळ माजली,एवढंच नव्हे तर तिच्या कारनाम्यामुळे रस्त्यावरची वाहतूकही ठप्प झाली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गाडीच्या बोनेटवर बसून मद्यपी महिलेचा धिंगाणा

कऱ्हाड-पाटण महामार्गावर मंगळवारी रात्री 8 च्या सुमारासा मोठ गोंधळ झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन नशेत धुंद झालेली ही महिला अचानक एमएससीबी चौकात रस्त्यावर आली आणि तिने जाणाऱ्या वाहनांना अडवण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर ती गाड्या थांबवून, अनेक वाहनांच्या टपांवर, बोनेटवर बसू लागली आणि तिने मोठमोठ्याने ओरडण्यासही सुरूवात केली.

तिचा हंगामा एवढ्यावरच थांबला नाही. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, त्या महिलेने पक्त गाडीवर बसून गोंधळ घातला नाही तर ती येणाऱ्या -जाणाऱ्या काही वानांवर दगडफेकही करत होती. मोठमोठ्याने ओरडत, दगडफेक करत तिचा हा धिंगाणा सुरूच होता. त्यामुळे अफरा -तफरी माजली, प्रचंड गोंधळ उडाला. अखेर स्थानिकांपैकी कोणीतरी या घटनेची माहिती कऱ्हाड पोलिसांना दिल्यावर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल

त्या महिलेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, ती महिला रस्त्याच्या मधोमध बसून ओरडताना दिसत आहे. त्यानंतर ती रस्त्यावर उभी राहिली आणि एक कार थांबवली, नंतर तिच्या बोनेटवरच जाऊन बसली. ती एवढ्यावरच थांबली नाही, नंतर तिने एक ट्रॅक्टरही रोखला. तिचा सगळा कारनामा व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.