मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ची एन्ट्री, दया नायक ATS कार्यालयात

| Updated on: Mar 22, 2021 | 12:49 PM

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसचा तपास अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे (Daya Nayak Mansukh Hiren death)

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्टची एन्ट्री, दया नायक ATS कार्यालयात
दया नायक ठाणे एटीएस कार्यालयात
Follow us on

ठाणे : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren death case) एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक (Daya Nayak) यांची एन्ट्री झाली आहे. ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक दाखल झाले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसचा तपास अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. (Encounter Specialist PI Daya Nayak at Thane ATS Office Mansukh Hiren death case)

कोण आहेत दया नायक?

दया नायक 1985 मध्ये मुंबई पोलीस दलात सहभागी झाले. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात एन्काऊंटर किंवा चकमक स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ख्याती झाली. छोटा राजन टोळीतील दोघा सदस्यांना त्यांनी पहिल्यांदा चकमकीत ठार केले. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील जवळपास 80 गँगस्टरना त्यांनी यमसदनी धाडले. गुन्हेगारांशी संबंध आणि अवैध मालमत्ता बाळगल्याच्या आरोपांनंतर 2006 मध्ये त्यांचे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दया नायक यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्यामुळे 2012 मध्ये त्यांना पुन्हा पोलीस दलात समाविष्ट करण्यात आले. 2015 मध्ये नागपुरात बदली झाल्यानंतर त्यांनी तिथे जाण्यास नकार दिला, त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

मनसुख हिरेन यांचा अर्धा तास व्हॉट्सअॅप कॉल

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात 11 जण सहभागी होते, अशी धक्कादायक माहिती ठाणे दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या ठिकाणी प्रत्यक्ष चार ते पाच जण उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकला, या ठिकाणी अटक आरोपी विनायक शिंदे स्वतः उपस्थित होता, असंही तपासात समोर आलं आहे.

हत्येच्या दिवशी म्हणजेच चार मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन अर्धा तास कुणाशी तरी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलत होते. हे नंबर अनोळखी होते, हेच सिमकार्ड बुकी नरेश गोर याने उपलब्ध करुन दिले असण्याची शक्यता आहे.  या सर्व कटाचे सूत्रधार अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) असल्याचे ठोस पुरावेही एटीएसला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Encounter Specialist PI Daya Nayak at Thane ATS Office Mansukh Hiren death case)

शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे. “अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे” असं शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

तपास एनआयएकडे

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren death case) तपास एनआयएकडे (NIA) सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) हा मोठा धक्का मानला जात आहे.

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन हत्या कटात 11 जण सहभागी, सचिन वाझे सूत्रधार, ठाणे ATS चा तपास निर्णायक टप्प्यावर

(Encounter Specialist PI Daya Nayak at Thane ATS Office Mansukh Hiren death case)