
बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे.. (Govind Barge) जनसामान्यांप्रमाणेच जीव जगत होती, पत्नी, मुलं, कुटुंबीय यांच्यासह रहात होते. मात्र विवाहीत असूनही वर्ष-दीड वर्षापूर्वी ते पूजा गायकवाडच्या (Pooja Gaikwad) प्रेमात पडले आणि तिथूनच एका नकोशा प्रवासाला सुरूवात झाली. बीड, सोलापूरसह अनेक भागात कलाकेंद्र ही काही नवी नाहीत. अशाच एका कलाकेंद्रात गेलेल्या गोविंद बर्गे यांना पूजा भेटली आणि तिथूनच त्यांच्या बर्बादीचा खेळ सुरू झाला. नर्तिका पूजाचा नाद लागला, तिच्या प्रेमात बर्गे हे वेडे झाले. पण पूजाचं काय ? पूजाचे गोविंदशी प्रेमसंबंध तर सुरू झाले पण तिच्यासाठी ते फक्त कस्टमर होते, ज्याच्याकडून महागड्या वस्तू, पैसे, सोनं-नाणं, जमीन वगैरे उकळता येईल.
ज्या पूजाच्या प्रेमात वेड होऊन गोविंद बर्गे यांनी आत्महत्य केल्याचं बोललं जातं त्या पूजाची अख्खी कुंडलीच समोर आली आहे. तिचं वागणं, एकेक कारनामे ऐकून तर सगळेच हैराण होतील. काय -काय केलं पूजाने?, जाणून घेऊया…
पूजाची कुंडली समोर
मिळालेल्या माहितीनुसार, सासुरे गावात राहणारी अवघ्या 21 वर्षांची पूजा गायकवाड ही बार्शीतील पारगावमधील एका कलाकेंद्रात काम करते.तिथे हौशी लोकं, धनदांडगे यांची तिन्ही त्रिकाळ भरपूर गर्दी असते. इथे डान्स करून या नर्तिका लोकांना खुश करतात आणि पैसे कमावतात. त्याच लोकांपैकी एक म्हणजे गोविंद बर्गे.वर्ष-दीड वर्षापूर्वी ते या कलाकेंद्रात गेले, तेथे त्यांची ओळख पूजाशी झाली. हळहूळ ओळख वाढू लागली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. विवाहीत असूनही गोविंद हे पूजाच्या प्रेमात पडले आणि पूजानेही विवाहीत बर्गे यांचा फायदा उचलण्यास सुरूवात केली.
Beed Crime Govind Barge Death : तर गोविंद बर्गे यांचा जीव वाचला असता, शेवटचा व्हिडीओ कॉल कोणाला ?
वर्षभराच्या काळात तिने त्यांच्याकडून लाखो रुपये, सोनं, नाणं, दागिने, महागडे मोबाईल लुटले. एवढंच नव्हे तर या वर्षाच्या सुरूवातील बर्गे यांनी पूजाला दीड गुंठ्याचा प्लॉट खरेदी करून दिला. मात्र एवढं करूनही पूजाची नजर बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर पडली. तो बंगला माझ्या नावे करून द्या, तुमच्या नावे असलेली जमीन माझ्या भावाच्या नावे करा अशी मागणी तिने केली. पण बर्गे यांना ते मान्य नव्हतं. त्यानंतर त्यांच्यातील वाद खरा विकोपाला गेला.
जमीन, पैसा, दागिने सगळं दिलं पण..
पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्याती बार्शी येथील पारगावातील एका कला केंद्रात काम करते. हे कला केंद्र म्हणजे, इथं अनेक हौशे आणि धनदाड्यांची गर्दी असते. इथं पार्ट्या भरवून पूजा गायकवाड सारख्या नर्तिका डान्स करून लोकांना खूश करतात. याच गर्दीत सामील झाले गोविंद बर्गे. पूजा गायकवाडला पाहून गोविंद बर्गे हे तिच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे, गोविंद बर्गे हे विवाहित होते. पण, तरीही कला केंद्रात जाऊन पूजावर त्यांनी पैसे उधळत होते. नुसते पैसे उधळले नाहीतर तिला सोनं, नातेवाईकांना जमिनी सुद्धा खरेदी करून दिल्या. जेव्हा तिने घर नावावर करून देण्याची मागणी केली, तेव्हा वाद विकोपाला गेला.
एरवी पाण्यासारखा पैसा उधळणारे गोविंद बर्गे ही मागणी मान्य करत नसल्याचे पाहून पूजाने खरं रूप दाखवलं. तिने हळूहळू त्याच्याशी बोलणं बंद केलं. तरीही तो बधत नाही म्हटल्यावर तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. एवढंच नव्हे तर माझं ऐकलं नाहीस तर तुझ्यावर बलात्काराच गुन्हा दाखल करेन अशीही धमकी दिली. या सगळ्या धमक्या, ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद बर्गे वैतागले, निराश झाले. वारंवार समजावूनही पूजा ऐकत नाही पाहून ते तिच्या घरी तिला समजवायला गेले, पण तरीही काहीच यश मिळालं नाही. अखेर त्याच रात्री गोविंद यांनी सासुरे गावात कारमध्ये बसून टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे. पण त्यांच्या नातेवाईकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त करत पूजावर गंभीर आरोप केलेत.
त्यानंतर वैराग पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं असून सध्या ती पोलिस कोठडीत चौकशीला सामोरी जात आहे. त्या दरम्यान तिने बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचीही कबूलीही दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पूजा गायकवाड कुठून आली ?
अवघ्या 21 वर्षांची पूजा सासुरे गावात राहते, ती नर्तिका असून आधी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुख्यात अशा कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती, अशी माहिती समोर आली आहे. कुलस्वामिनी हे कला केंद्र हे बेकायदेशीररित्या उभारल्याचा आरोप असून त्याविरोधात आजूबाजूच्या गावातील लोकांनी आंदोलन करत हे कला केंद्र बंद करण्याची मागणी केली होती. पूजा तिथेच नृत्य करायची अशी माहिती समोर आली आहे. तिची सुरुवात याच कला केंद्रात झाल्याचे समजते.. कुलस्वामिनी केंद्रात सर्रासपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं. तिथूनच पूजा हे शिकल्याचीही माहिती समोर येत आहे.
वर्षभर पैसे उकळूनही पूजाचं समाधान न झाल्याने तिने बर्गेंकडे आणखी जमीन, बंगल्याची मागणी केली. त्यासाठी ब्लॅकमेलिंगही केलं. मात्र आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिने दिलेल्या अशा वागणुकीमुळे बर्गे निराश झाले, तणावात होते आणि अखेर त्यामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं अशी चर्चा आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या पूजाच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं ठरेल.