Beed Crime Govind Barge Death : माजी उपसरपंच गोविंद बर्गेंच्या मृत्यूवेळी नर्तकी पूजा कुठे होती ? पोलिसांचा मोठा खुलासा
Pooja Gaikwad Location : बरेच दिवस पूजा बोलत नसल्याने गोविंद बर्गे बोलत नव्हते, ते सतत तिला फोन करत होते पण काहीच संपर्क होत नव्हता. अखेर तिची समजूत काढण्साठी गोविंद हे कार घेऊन सासुरे गावात गेले. त्याच कारमध्ये दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. मात्र त्यांचा मृत्यू झाला तेव्हा पूजा कुठे होती ?

Govind Barge : कलाकेंद्रात नर्तकीशी झालेली भेट एवढी घातक ठरेल आणि एक दिवस जीवावर बेतेल याचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे ( Govind Barge) यांनी कधीच विचारही केला नव्हता. वर्षभरापासून त्यांचे पूजाशी (Pooja Gaikwad) प्रेमसंबंध होते, आधी गोड वागणाऱ्या पूजाला पैसा अडका, मोबाील, सोनं-नाणं सगळं दिलं पण हळूहळू तिच्या मागण्या वाढल्या आणि त्या पूर्ण न झाल्यावर तिच खरं रूप समोर आलं. आधी हट्ट करणारी पूजा नंतर आक्रमक झाली, ब्लॅकमेलिंग करत धमक्याही देऊ लागली यामुळे गोविंद बर्गे तमावात होते. 2025चा सप्टेंबर महीना त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.
गेवराईचा बंगला द्या, तुमची पाच एकर जमीन भावाचे नावे करा अशा मागण्या तिने केल्या आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे तिने आधी अबोल धराल, मग थेट ब्लॅकमेलिंगच सुरू केलं. तिला समजावण्यासाठी गोविंद सतत फोन करायचे पण तिने प्रतिसादच दिलानाही. अखेर तिला भेटून समजूत काढण्यासाठी सोमवारी रात्री गोविंद बर्गे हे बार्शी तालुक्यातील पूजाच्या सासुरे गावात गेले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. डोक्यात गोळी मारल्याने गोविंद यांचा मृत्यू झाला. मात्र हे सर्व घडलं तेव्हा पूजा गायकवाड नक्की कुठे होती ?
गोविंदच्या मृत्यूवेळी पूजा कुठे होती ?
गोविंदचा मृत्यू हा आत्महत्या नसून तो घातापात आहे असा संशय त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, आणि मित्रांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर वैराग पोलिसांनी पूजा गायकवाड (वय 21) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतंलं. कोर्टासमोर हजर केल्यावर तिला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून सध्या पोलिस तिची कसून चौकशी करत आहेत. आता याच चौकशीदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या रात्री गोविंदचा मृत्यू झाला, त्यावेळी पूजा गायकवाड कुठे होती असा प्रश्न अनेकांच्या मनात असून पोलिसांनी त्याचं प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
पूजाचं लोकेशन काय होतं ?
सासुरे गावात पूजाला भेटायला गेलेल्या गोविंद यांची कार तिच्या घरापासून थोड्या अंतरावर सापडली आणि त्यातच गोविंद यांचा मृतदेहही आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद यांच्या मृत्यूच्या वेळी पूजा ही सासुरे गावात, तिच्या घरी नव्हती. पोलिसांच्या सांगण्यानुसार, पूजा रात्रभर पारगावमधील कलाकेंद्रात होती. गोविंद बर्गे गेवराईहून पूजाला शोधत तिच्या सासुरे गावी आले, पण तिचा फोन लागत नव्हता. गावात आल्यावरही त्यांनी तिला अनेकवेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर सकाळी थेट त्यांचा मृतदेहच सापडला. पोलीस सध्या गोविंद बर्गे आणि पूजा या दोघांमधील कॉल रेकॉर्ड तपासत असून त्यावरूच पुढील दिशा मिळेल. याप्रकरणी आता काय नवा उलगडा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
