AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime Govind Barge Death : तर गोविंद बर्गे यांचा जीव वाचला असता, शेवटचा व्हिडीओ कॉल कोणाला ?

मृत्यूपूर्वी गोविंद बर्गेच्या पूजाच्या गावी गेला, तिथे तिची आई भेटली, पण पूजाची भेट झाली नाही. परत जाण्यापूर्वी गोविंदने एक शेवटचा व्हिडीओ कॉल केला होता. कोणाला होता तो कॉल ?

Beed Crime Govind Barge Death : तर गोविंद बर्गे यांचा जीव वाचला असता, शेवटचा व्हिडीओ कॉल कोणाला ?
गोविंद बर्गेंचा शेवटचा व्हिडीओ कॉल कोणाला ?Image Credit source: social media
| Updated on: Sep 12, 2025 | 3:21 PM
Share

बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge)  यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्य हादरलं असून मोठी खबळ उडाली आहे. नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी ब्लॅकमेलिंग आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या मिळालेल्या धमक्यामुळे आत्महत्या केली असे बोलले जाते. पूजा हिच्या सासुरे गावातच कारमध्ये बसून त्यांनी रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून घेतली आणि आयुष्य संपवलं असं म्हटलं जात आहे. तर गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांना मात्र हे पटत नसून त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्याच्याकडे साधी काठीही नसायची तर पिस्तुल कोठून येणार असा प्रश्न विचारत नातेवाईकांनी पूजावर घातपाताचा आरोप केला आहे.

त्यामुळे ही नक्की आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून नातेवाईकांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी नर्तिका पूजा हिला ताब्यात घेतलं, सध्या पोलिस कोठडीत असलेल्या पूजाची कसून चौकशी केली जात असून तिच्या जबाबातून बरेच महत्वाचे धागेदोरे मिळू शकतात. दरम्यान याच प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं असून एका व्हिडीओ कॉलमुळे गोविंद यांचा जीव वाचू शकला असता का अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे प्रकरण ?

गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. ते विवाहीत होते, पत्नी, दोन मुलं, कुटुंबीयांसोबत ते घरी रहात होते. साधारण वर्षभरापूर्वी गोविंद बर्गे यांची पारगाव कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडशी ओळख झाली. हळूहळू त्यांची जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. पण या दरम्यान पूजाने त्यांच्याकडून अनेक वेळा पैसे, दागिने, महागडा मोबाईल घेतला. एवढंच नव्हे तर सासुरे गावातील घराच्या बांधकामासाठीही गोविंद यांनी तिला पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. एवढं सगळं करूनही पूजाची हाव काही संपत नव्हती.

Beed Crime Govind Barge Death : उपसरपंच गोविंद बर्गेच्या मृत्यूनंतर आता पूजाने तोंड उघडलं, दिली मोठी कबुली

बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर तिचा डोळा होता. तो मला द्या, तसेच त्यांच्या नावे असलेली पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावे करा अशी मागणी पूजा सातत्याने गोविंदकडे करत होती. तिच्या अपेक्षा काही संपेनात. या मागण्यांसाठी ती सातत्याने गोविंदवर दबाव टाकत होती. कधी अबोल धरायचा तर कधी ब्लॅकमेल करायचं असे तिचे उद्योग सुरूच होते. एवढंच नव्हे तर माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही तिने गोविंद यांना दिली होती. या सर्व गोष्टींमुळेच गोविंद बर्गे 5-6 दिवसांपासून तणावात होते, ते कोणाशी जास्त बोलायचे नाहीत अशी माहिती मित्रांनी दिली.

त्या दिवशी काय घडलं ?

जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं तिचं वागण गोविंद याना पट नव्हतं. ते तिला समजवण्याचा प्रय़त्न करत होते, मात्र पूजा त्यांच्याशी बोलत नव्हती, फोनही उचटलत नव्हती. अखेर तिची समजूत काढण्यासाठी घटनेच्या दिवशी सोमवारी, गोविंद हे पूजाच्या सासुरे गावातील घरी गेले. तिथे ती घरी नव्हती. पण त्यांनी तिच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही.

Beed Crime Govind Barge Death : माजी उपसरपंच गोविंद बर्गेंच्या मृत्यूवेळी नर्तकी पूजा कुठे होती ? पोलिसांचा मोठा खुलासा

तर जीव वाचला असता..

सगळीकडून कोंडी झाल्यामुळे संतापलेल्या गोविंद हे पूजाच्या आईच्या घरासमोर गेले आणि त्यांनी व्हिडीओ कॉलवरआत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र समोरून कोणीच प्रतिसाद दिला नाही. हे पाहून त्यांचीनिराशा,संताप आणइ खीनच वाढला आणि ते तिथून कारमध्ये बसून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासून काही अंतरावर त्यांची कार उभी होती. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून कारचा दरवाजा उघडला आण समोरचं दृश्य पाहून ते हादरलेच.

कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले गोविंद हे मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. आदल्या दिवशी गोविंद यांनी कॉल केल्यावर पूजा त्यांच्याशी बोलली असती तर कदाचित त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं नसतं आणि त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा सध्या सुरू आहे. पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.