AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pansare Murder : गोविंद पानसरे हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे द्या, कुटुंबियांची उच्च न्यायालयात धाव

एसआयटीकडून समाधानकारक तपास होत नसल्यानं या प्रकरणाचा गतीने तपास व्हावा. लवकरारत लवकर सूत्रधार अटक व्हावे, यासाठी पानसरे कुटुंबीयांनी हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात यावा, या मागणीसाठी पानसरे कुटुंबीयांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

Pansare Murder : गोविंद पानसरे हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे द्या, कुटुंबियांची उच्च न्यायालयात धाव
Govind PansareImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 07, 2022 | 5:25 PM
Share

कोल्हापूर : गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS)कडे द्या, या मागणीसाठी पानसरे यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालया (High Court)त धाव घेतली आहे. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक एसआयटीकडून महाराष्ट्र एटीएसकडे द्यावा अशी मागणी करणारी याचिका पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. अॅड. अभय नेवगी यांनी पानसरे कुटुंबीयांची बाजू मांडली. स्थानिक एसआयटीच्या तपासातील त्रुटी आणि महाराष्ट्रात एटीएसकडे तपास का सुपूर्द करावी यावर अॅड. नेवगी यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद केला. यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला याबाबत आपले मत मांडण्याची सूचना केली आहे. सरकारचे म्हणणे ऐकल्यानंतरच याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सरकारने मत मांडल्यानंतरच तपास कुणाकडे जाणार हे स्पष्ट होईल

स्थानिक एसआयटीने योग्य पद्धतीने तपास केला नाही. अद्याप एसआयटी आरोपींपर्यंत पोहचली नाही. एसआयटीकडून समाधानकारक तपास होत नसल्यानं या प्रकरणाचा गतीने तपास व्हावा. लवकरारत लवकर सूत्रधार अटक व्हावे, यासाठी पानसरे कुटुंबीयांनी हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात यावा, या मागणीसाठी पानसरे कुटुंबीयांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला आपले मत मांडण्याचे आदेश दिलेत. स्थानिक एसआयटीचे कामकाज कशाप्रकारे सुरु आहे. हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय. महाराष्ट्र एसआयटीकडे तपास सोपवण्याची आवश्यकता आहे का ? याबाबत सरकारला मत मांडण्याच्या सूचना न्यायालयाने दिले आहेत. यावर सरकारने आपली बाजू मांडल्यानंतरच हा तपास स्थानिक एसआयटीकडेच राहणार की महाराष्ट्र एटीएसकडे सोपवणार हे स्पष्ट होईल.

तिरुपती काकडे यांच्या बदलीला मान्यता

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे हे या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. त्यांचा कोल्हापुरातील कार्यकाळ संपला असून बढतीवर त्यांची बदली होणार आहे. मात्र पानसरे प्रकरणात तपास अधिकारी असल्याने त्यांची बदली अद्याप रोखण्यात आली आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी बदलू नये अशी पानसरे कुटुबीयांनी विनंती केली होती. याबाबत पोलीस विभागाकडून काकडे यांची बढतीवर बदली करण्याची विनंती न्यायालयामार्फत पानसरे कुटुंबीयांना करण्यात आली होती. याला पानसरे कुटुंबियांनीही मान्यता दिली आहे. (Family members demanded in the High Court that the investigation of Govind Pansare murder be handed over to the Maharashtra ATS)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.