पळून गेलेल्या जोडप्याला मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीत शोधलं, ग्वालियरमध्ये नेलं, मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचा गळा चिरला

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथून ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्येची घटना फक्त उत्तर प्रदेशच नाही तर मध्यप्रदेश आणि राजस्थान अशा एकूण तीन राज्यांसोबत जोडली गेली आहे.

पळून गेलेल्या जोडप्याला मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीत शोधलं, ग्वालियरमध्ये नेलं, मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचा गळा चिरला
प्रातिनिधिक फोटो

लखनऊ : प्रत्येकाला हवं तसं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आपण कुणावर प्रेम करावं किंवा कुणासोबत लग्न करावं, याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, आपल्या देशातही आजही प्रेम विवाह ही संकल्पना समाजात पूर्णपणे रुजलेली नाही. त्यातूनच सैराट चित्रपटासारख्या ऑनर किलिंगच्या घटना समोर येतात. या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरतो. या घटनांवर काही दिवस चर्चा होते. त्यानंतर सर्वचजण विसरतात आणि आपापल्या मार्गाला लागतात. पण त्यावर योग्य मार्ग निघत नाही. समाज प्रगल्भ व्हावा यासाठी काहीतरी चांगला मार्ग निघत नाही. त्यामुळे पुन्हा काही दिवसांनी तशीच घटना समोर येते. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथून अशीच ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्येची घटना फक्त उत्तर प्रदेशच नाही तर मध्यप्रदेश आणि राजस्थान अशा एकूण तीन राज्यांसोबत जोडली गेली आहे.

नेमकं प्रकरण काय?

फिरोजाबाद येथे वास्तव्यास असलेले प्रेमी युगुल एकमेकांवर प्रचंड प्रेम करायचे. पण दोघांच्या कुटुंबियांना त्यांचं प्रेम मान्य नव्हतं. पण दोघं एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. अखेर दोघांनी कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानला 31 जुलैला पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते फिरोजाबाद येथून पळून दिल्लीला गेले. प्रेमी युगुल पळून गेल्यानंतर मुलीचे कुटुंबिय सैरभैर झाले. ते दोघांना शोधायला लागतात.

मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचाही गळा चिरला

या दरम्यान मुलगा-मुलगी दिल्लीला गेल्याची माहिती त्यांना मिळते. त्यानुसार मुलीचेल कुटुंबिय दिल्लीत त्यांचा शोध घेतात. अखेर ते दोघांना शोधून काढतात. त्यानंतर मुलीचे नातेवाईक दोघांना मध्यप्रदेशच्या ग्वालियर शहरात घेऊन जातात. तिथे झांसी महामार्गावर ते तरुणाला अमानुषपणे मारहाण करतात. यावेळी आरोपी तरुणाचे लिंग कापत त्याची हत्या करतात. त्यानंतर त्याचा मृतदेह फेकून देतात. दुसरीकडे मुलीसोबतही आरोपी तसंच वागतात. आरोपी मुलीचा गळा चिरुन हत्या करतात. त्यानंतर ते तिला घटनास्थळापासून 100 किमी दूर राजस्थानच्या धौलपूर परिसरात फेकून पळून जातात.

मृतक तरुण-तरुणींचा मृतदेह पोलिसांच्या हाती

संबंधित घटनेनंतर 5 ऑगस्टला ग्वालियरच्या पोलिसांना मृतक तरुणाचा मृतदेह सापडतो. तरुणाचा मृतदेह बघून त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट होतं. पोलीस या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करतात. पण मृतक तरुणाची ओळख होत नाही. दुसरीकडे मृतकच्या वडिलांनी फरीदाबाद येथील पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान राजस्थान पोलिसांना धौलपूर परिसरात मृतक तरुणीचा मृतदेह सापडतो. तिचा गळा चिरुन हत्या झाल्याचं पोलिसांना समजतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात करतात.

हत्येचा उलगडा, आरोपींना बेड्या

सगळ्या घडामोडी आपापल्या ठिकाणी घडत असताना फिरोजाबाद पोलीस ग्वालियरच्या पोलिसांना संपर्क करतात. त्यांच्यात झालेल्या संभाषणात ग्वालियर इथे मिळालेला मृतदेह हा फिरोजाबादच्या तरुणाचं असल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतर पोलीस आणखी खोलात तपास करतात तेव्हा तरुणाच्या प्रेम प्रकरणाची माहिती त्यांना मिळते. पोलीस मृतकाच्या प्रेयसीच्या कुटुंबियांचा फोन नंबर शोधून काढतात. त्यानंतर पोलीस तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत मुलीचे वडील, काका आणि आणखी दोन नातेवाईकांना बेड्या ठोकतात. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी आपला गुन्हा कबूल करतात. या प्रकरणाचा आणखी पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

खदानीत झाडावर आढळला लटकता मृतदेह, आठ दिवसांपासून बेपत्ता कामगाराचा शोध लागला, हत्या की आत्महत्या?

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, पुण्याच्या शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI