काय घडतंय हे? भाऊच जीवावर उठला, मोबाइलसाठी विहिरीत ढकललं, कवटी फुटेपर्यंत दगडानं ठेचलं, औरंगाबादमध्ये अल्पवयीनाचं कृत्य उघड

आत्तेभावाला आजोबांनी मोबाइल घेऊन दिला पण मला नाही दिला, याचा राग आल्याने मामेभावाने त्याचा अत्यंत निर्घृण खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर अल्पवयीनाचे हे कृत्य ऐकून पोलिसही सून्न झाले.

काय घडतंय हे? भाऊच जीवावर उठला, मोबाइलसाठी विहिरीत ढकललं, कवटी फुटेपर्यंत दगडानं ठेचलं, औरंगाबादमध्ये अल्पवयीनाचं कृत्य उघड
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 2:32 PM

औरंगाबादः भावाला मोबाइल मिळाला पण आपल्याला नाही मिळाला, याचा राग आल्यानं औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलानं भावाला थेट विहिरीत (Murder) ढकललं. पडलेल्या भावानं प्राण वाचवण्यासाठी विहिरीतल्या दोरीला पकडलं. पण तरीही राग शांत न झाल्यानं काठावरील भावानं दगडानं त्याचं डोकं ठेचून ठार मारलं. औरंगाबादमधील वाळूज पोलीस (Aurangabad police) स्टेशनच्या हद्दीत घडलेला हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. सदर मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी दिली होती. अखेर तपासाअंती हा सर्व प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन मुलानं रागाच्या भरात केलेल्या या कृत्यानं औरंगाबादमध्ये खळबळ माजली आहे.

आजोबांनी त्यालाच मोबाइल घेऊन दिल्याचा राग

औरंगबाादमधील वाळूज पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण गुन्ह्याची उकल आज झाली. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ही दोन्ही मुले 17 वर्षांची असून ते आत्ते-मामे भाऊ आहेत. काही दिवसांपूर्वी आजोबांनी आत्तेभावाला मोबाइल घेऊन दिला. पण मामेभावाला हे खपत नव्हतं. त्यानंतर मामेभावाचा खून करायचं ठरवलं.

खुनासाठी रचला कट, पार्टीसाठी बोलावलं…

अत्यंत गंभीर अशा प्रकारात, सदर मामेभावानं आत्तेभावाचा खून करायचं ठरवलं. आपण पार्टी करुयात असं म्हणत तो बिडकीन येथे घेऊन गेला. रस्त्यात ढोरकीनच्या रस्त्यावर बिर्याणी खाल्ली. त्या ठिकाणी एक विहिर होती. विहिरीवर आपण फोटो काढू असं म्हणत त्याला विहिरीजवळ नेलं.. आधी स्वतःचा फोटो विहिरीजवळ काढला. त्यानंतर आत्तेभावाला विहिरीच्या काठावर उभं केलं. मी फोटो काढतो म्हणाला आणि त्याला विहिरीत ढकललं.

बचावासाठी दोर पकडली, पण भावाने दगडानेही ठेचलं..

अचानकपणे धक्का दिल्याने सदर मुलगा विहिरीत पडला. पण त्याने विहिरीतल दोरीला घट्ट पकडून ठेवले. आपण ढकलून दिल्यावरही भाऊ पडलाच नाही, हे पाहून मामेभावाने दगडाने त्याचं डोकं ठेचलं.. अखेर रक्तबंबाळ होऊन तो विहिरीत पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला…

कवटीही फुटल्याने तपासाला उशीर

इकडे आत्तेभाऊ बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपासही सुरु केला होता. 3 डिसेंबरला पोलिसात मिसिंगची तक्रार झालेली होती. ढोरकीन परिसरातीलस विहिरीत या मुलाचा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. मृतदेहाची कवटी फुटल्याने हा घातपात असल्याचा पोलिसांना संशय आला. तसेच मोबाइलच्या लोकेशनवरून सीडीआर काढण्यात आलं आणि तिथून पोलिसांना या गुन्ह्याची उकल झाली. चौकशीअंती घटनेतील मामेभावानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून भावाला मोबाइल मिळाल्याच्या रागातूनच हे कृत्य केल्याचं उघड झालं.

इतर बातम्या-

Helicopter Crash | कुणाचे प्रमोशन तर कुणी सेवानिवृत्तीजवळ, CDS बिपीन रावतांसह देशाच्या ‘या’ वीरांनीही गमावले प्राण!

Amla Side effects : ‘या’ लोकांसाठी आवळ्याचे सेवन ठरू शकते हानिकारक, वाचा महत्वाची माहीती!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.