AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेबी नगर लोकेशनवरुन दुवा जुळला, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या रडारवर

प्रदीप शर्मा यांनी चौकशीत अनेक प्रश्नांची काल उत्तरे दिली. तर काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आठवत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. (Pradeep Sharma NIA enquiry)

जेबी नगर लोकेशनवरुन दुवा जुळला, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या रडारवर
चकमक फेम प्रदीप शर्मा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 08, 2021 | 3:49 PM
Share

मुंबई : मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे एनआयएच्या रडारवर आहेत. शर्मांची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरु आहे. एक विद्यमान पोलीस अधिकारी आणि एक निवृत्त पोलीस अधिकारी यांची सचिन वाझेंच्या केबिनमध्ये मीटिंग झाली होती. एनआयए त्याबद्दल प्रदीप शर्मांना विचारत आहे. कालही शर्मांची साडेसात-आठ तास चौकशी झाली होती.  (former Mumbai Police officer Pradeep Sharma NIA enquiry)

प्रदीप शर्मांच्या चौकशीची कारणं काय?

एनआयएच्या अटकेतील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि काँस्टेबल विनायक शिंदे यांचं वरळी सी लिंकवरील सीसीटीव्ही फूटेज समोर आलं होतं. त्याच दिवशी (2 मार्च) वाझे आणि शिंदे यांनी अंधेरीच्या जे बी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची भेट घेतली होती. प्रदीप शर्माही जे बी नगरमध्येच राहतात.

‘तावडे’चे लास्ट कॉल लोकेशन जे बी नगर

मनसुख हिरेन यांना ज्या नंबरवरुन ‘तावडे’ नावाने कॉल करुन घोडबंदर रोडला बोलवण्यात आले होते. त्या सिमचे शेवटचे लोकेशनही जेबी नगर होते. सूत्रांकडून जी माहिती मिळते, त्यानुसार वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर प्रदीप शर्मा हे एटीएस कार्यालयातही गेले होते जिथे जाऊन त्यांनी एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची भेट घेतली होती.

‘त्या’ लेटरसाठी शर्मांनी वाझेंना मदत केल्याचा संशय

सचिन वाझे 3 तारखेला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भेटून अंधेरी परिसरात गेले होते आणि तिथे त्यांनी शर्मा यांची भेट घेतली होती अशीही चर्चा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्फोटके प्रकरणात ज्या ‘जैश उल हिंद’ दहशतवादी संघटनेने स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्या लेटरसाठी प्रदीप शर्मा यांनी वाझेंना मदत केली असा संशय NIA ला आहे.

जिलेटिनची व्यवस्था प्रदीप शर्मांनी केल्याची शक्यता

एनआयएने केलेल्या तपासणीत असे आढळले की सचिन वाझे यांनी जिलेटिन खरेदी केली असावी, असे न्यायालयातही म्हटले आहे. अशा परिस्थितीत सचिन वाझे यांनी प्रदीप शर्मा यांच्यामार्फत जिलेटिनची व्यवस्था केली होती का? याची चौकशी केली जात आहे. प्रदीप शर्मांची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे आणि त्यांचे बर्‍याच लोकांशी संबंध आहेत. जी जिलेटिन अँटिलियाबाहेर गाडीत सापडली, ती नागपूरच्या एका कंपनीची होती, जी व्यापारी उद्देशाने विकली गेली होती. परंतु अजूनही समोर आलेले नाही, की कोणाला पुरवलेल्या बॉक्समधून हे जिलेटिन काढले गेले होते. अशा परिस्थितीत या जिलेटिनची व्यवस्था प्रदीप शर्मा यांच्याकडून झाली आहे का, याबद्दलही एनआयएकडून विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत प्रदीप शर्मा यांच्यावर संशयाची सुई आहे. म्हणूनच एनआयए प्रकरण सुरु होण्याच्या दिवसापासून गुन्ह्याच्या दिवसापर्यंत प्रदीप शर्मांच्या हालचालींची चौकशी करत आहे. (former Mumbai Police officer Pradeep Sharma NIA enquiry)

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी 113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव 1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती

प्रदीप शर्मा यांनी चौकशीत अनेक प्रश्नांची काल उत्तरे दिली. तर काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आठवत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जवळपास साडेसात तास त्यांची चौकशी चालली होती. अशा परिस्थितीत एनआयएने पुन्हा शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

संबंधित बातम्या :

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल

(former Mumbai Police officer Pradeep Sharma NIA enquiry)

Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती