एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल

एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा (Pradeep Sharma threat Election Officer) यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच बघून घेण्याची धमकी दिली आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 21, 2019 | 10:14 PM

विरार : एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा (Pradeep Sharma threat Election Officer) यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच बघून घेण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली असून शर्मा (Pradeep Sharma threat Election Officer) यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरार पूर्व चंदनासार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना निवडणूक मैदानात उतरवले होते. प्रदीप शर्मांनी हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात चांगलाच जोर लावला आहे. प्रचारादरम्यान शर्मा आणि ठाकूर गटात अनेकदा वाद झाले. मात्र, आता मतदान अधिकाऱ्यांशीही वाद केल्याने प्रदीप शर्मांवर अरेरावीचा आरोप होत आहे.

मतदान केंद्रात जबरदस्ती प्रवेश करणे, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे असे गंभीर आरोप प्रदीप शर्मांवर आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर आयपीसी 186, 504, 506, लोकप्रतिनिधी कायदा कलम 131 (1)(2), 171 (ब) प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें