AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री दुकानाच्या शेडमध्ये चार मुलांसह झोपली होती महिला, सकाळी उठून पाहते तर तीनच मुलं होती !

सैलानी बाबाच्या दर्ग्याहून परतलेली महिला रात्री आपल्या चार मुलांसह एका दुकानाच्या शेडखाली झोपली होती. मात्र सकाळी उठली तर शेजारी फक्त तीन मुलं होती.

रात्री दुकानाच्या शेडमध्ये चार मुलांसह झोपली होती महिला, सकाळी उठून पाहते तर तीनच मुलं होती !
आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाचे अपहरणImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2023 | 5:03 PM
Share

नागपूर : आईच्या कुशीत झोपलेल्या चार ते पाच महिन्यांच्या बाळाचं अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील मोमीनपुरा भागातील मस्जिदजवळ ही घटना घडली. एका दुकानाच्या शेडमध्ये आपल्या चार मुलांसह ही महिला झोपली होती. महिला झोपेत असताना तिचं चार ते पाच महिन्याचं बाळ चोरीला गेल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत बाळाचा शोध सुरू केला. महिला बेघर असून, रस्त्याच्या कडेला किंवा दुकानाच्या शेडखाली रात्री मुलांसह राहते.

रात्री दुकानाच्या शेडखाली मुलांसह झोपली होती महिला

रिहान प्रवीण वसीम अन्सारी नावाची एक महिला रात्री सैलानी बाबाच्या दर्ग्यावरून नागपुरात दाखल झाली. नागपुरात आल्यानंतर ती महिला मोमीनपुरा परिसरातील मस्जिदच्या बाजूला असलेल्या एक दुकानाच्या शेडमध्ये आपल्या चार मुलांसह रात्रभर झोपली. या चार मुलांमध्ये एक चार ते पाच महिन्यांचं बाळ सुद्धा होतं. बाळ रडत असल्याने पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या महिलेने बाळाला दूध पाजलं आणि त्यानंतर ती पुन्हा झोपली. मात्र सकाळी जेव्हा दुकानदार आपले दुकान उघडायला आला. तेव्हा या महिलेला तिथून उठवलं तर त्या महिलेजवळ तिचं बाळ दिसलं नाही. त्यामुळे तिने बाळाचा शोध सुरू केला आणि बाळ न सापडल्याने ती अखेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.

पोलिसांकडून बाळाचा शोध सुरु

तहसील पोलिसांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या बाळाचा शोध सुरू केला आहे. महत्त्वाचं म्हणजे ही महिला नागपूरची असली तरी तिचं कुठेही घर नाही. ती आपल्या पती आणि मुलांसोबत रस्त्यावरच राहते. जिथे मिळेल तिथे खात असते. पतीसोबत ती सैलानी बाबा दर्गा येथे गेली होती. मात्र पती तिथेच थांबला आणि ती महिला नागपुरात आली. पती अजून नागपूरत पोहोचला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.