AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो सांगत लाखोंची फसवणूक, ‘असा’ घातला महिलेला गंडा

शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेला लाखो रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र पैसे परत मागताच महिलेला धमकावण्यास सुरु केले.

शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो सांगत लाखोंची फसवणूक, 'असा' घातला महिलेला गंडा
शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूकImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 27, 2023 | 8:49 PM
Share

गोविंद ठाकूर, मुंबई : शेअर बाजारात जास्त परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तीन आरोपींना मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली आहे. कल्याणसिंग करणसिंग चंदेल उर्फ ​​पियुष अग्रवाल, अनुज रामनारायण भगोरिया, भीमसिंग गोवर्धन मिना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 1 लॅपटॉप, 9 मोबाईल, 8 सिम कार्ड, 15 डेबिट कार्ड, 2 पासबुक आणि 1 चेकबुक जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची 31 लाख 7 हजार रुपयांची फसवणूक केली.

जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले

तक्रारदार महिलेने काही वर्षांपूर्वी डिमॅट खाते उघडले होते. पण शेअर बाजारातील नुकसानीमुळे तिने या खात्यातील व्यवहार बंद केला होता. मात्र एप्रिल 2021 मध्ये तिला ए.के. फायनान्शियल सर्व्हिसेसचे कर्मचारी बोलतोय सांगत वारंवार फोन येत होते. ए.के. फायनान्शिअल सर्व्हिसेसने तिला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आश्वासन देऊन पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी तयार केले. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी 5000 समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून 3700 रुपये घेतले.

स्क्रीनशॉट दाखवून महिलेला वेळोवेळी गंडवले

सोने आणि कच्च्या तेलातील गुंतवणुकीवर चांगला परतावा दाखवणारा स्क्रीनशॉट आरोपीने महिलेला पाठवला. त्यानंतर गुंतवणुकीच्या नावावर महिलेचे 163 वेळा ट्रान्सजेंडर झाले, ज्यामध्ये 5 हजार ते 60 हजारांची रक्कम पाठवण्यात आली. मार्च 2023 पर्यंत महिलेने शेअर बाजारात 31 लाख 7 हजारांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर आरोपींनी तिला व्हॉट्सअॅपवर नफ्याच्या डेटाचा स्क्रीनशॉट पाठवला.

पैसे परत मागितले असता फसवणूक झाल्याचे उघड

महिलेने नफ्याची रक्कम काढण्याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी बँक व्यवहारातील तोटा नफा आणि कर भरण्याच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी केली. मात्र तक्रारदार महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या कुटुंबीयांना इजा करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आणि तिच्या घरी रिकव्हरी एजंट पाठवले. त्यानंतर महिलेने मार्च 2023 मध्ये उत्तर मुंबई सायबर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत मध्य प्रदेशातून ती आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या ठग टोळीत आणखी किती लोक सामील होते, तसेच शेअर बाजारात जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा तपास सायबर पोलीस करत आहेत.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.