धक्कादायक, जेवणाच्या सुट्टीत नराधमांनी डाव साधला, विद्यार्थीनीवर बलात्कार करून पळ काढला

धक्कादायक, जेवणाच्या सुट्टीत नराधमांनी डाव साधला, विद्यार्थीनीवर बलात्कार करून पळ काढला
Gang-Rape case

नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी 24 जानेवारी रोजी आपल्या भावाबरोबर शाळेत गेली होती. शाळेतील विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी असताना त्याच शाळेतील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या मुलीला जबरदस्तीने दुचाकीवरून बसवून तिला डोंगरावर घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 27, 2022 | 7:43 PM

डूंगरपूरः राजस्थानातील (Rajasthan) डूंगरपूरमधील नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक बलात्कार (Gangrape) झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्याच शाळेतील (School Girl) दोन विद्यार्थ्यांनी तिचे अपहरण करून जंगलात घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर मुलीली खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली असून या प्रकरणातील दोन्ही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  राजस्थानमध्ये एकाच आठवड्यातील ही चौथी घटना आहे. महिलांच्या बाबतीत सतत अशा प्रकरणामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिंच्या जीवाला धोका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दिल्लीतील गॅंग रेप प्रकरणाचे पडसाद साऱ्या देशभर उमटले होते, त्यानंतर हे प्रकरण सरकारसह अनेक सामाजिक संस्थांनी लावून धरले होते. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणीही होत आहे.

नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी 24 जानेवारी रोजी आपल्या भावाबरोबर शाळेत गेली होती. शाळेतील विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी असताना त्याच शाळेतील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या मुलीला जबरदस्तीने दुचाकीवरून बसवून तिला डोंगरावर घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर त्या मुलांनी मुलीला घराबाहेर टाकून पलायन केले. जखमी मुलीला घराबाहेर टाकून पळून गेलेल्या मुलांविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्या येत आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींच्या जीवाला धोका असल्याची भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केली जात आहे.

संशयितांना तात्काळ अटक

त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती तिने आपल्या कुटुंबियांनी दिली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तिच्या वडिलांनी बिछीवाडा पोलिसात मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणातील मुलांना तात्काळ अटक केली. बलात्काराची अनेक प्रकरणे पोलिसात दाखल आहेत. मात्र अनेक प्रकरणातील आरोपी सापडले नसून त्याबद्दल पोलीस काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

‘बेवड्यांना समर्पित सरकार’, मुनगंटीवारांचा हल्लाबोल; तर ‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’ दरेकरांचाही घणाघात

आधी त्यानं गर्लफ्रेंडला मालामाल केलं, नंतर थेट आत्महत्याच केली, दरम्यान लव्हमध्ये लोच्या कसा झाला?

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें