आधी त्यानं गर्लफ्रेंडला मालामाल केलं, नंतर थेट आत्महत्याच केली, दरम्यान लव्हमध्ये लोच्या कसा झाला?

आधी त्यानं गर्लफ्रेंडला मालामाल केलं, नंतर थेट आत्महत्याच केली, दरम्यान लव्हमध्ये लोच्या कसा झाला?
Suicide-haryana.

हरियाणामधील फतेहाबादमध्ये एक युवक बॅंकेत काम करणाऱ्या एका तरुणीवर प्रेम करत होता. प्रेमाखातर त्या तरुणाने तरुणीला 70 लाख आणि काही दागिने उधारीवर दिले. ज्यावेळी त्याने पैसे आणि दागिने मागण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला त्या युवतीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी त्याला दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 27, 2022 | 6:42 PM

दिल्लीः  हरियाणामधील फतेहाबादमध्ये एक युवक बॅंकेत काम करणाऱ्या एका तरुणीवर प्रेम करत होता. प्रेमाखातर त्या तरुणाने तरुणीला 70 लाख आणि काही दागिने उधारीवर दिले. ज्यावेळी त्याने पैसे आणि दागिने मागण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला त्या युवतीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा (Crime) तुझ्यावर दाखल करणार असल्याची धमकी त्याला दिला. त्यामुळे तणावाखाली येऊन युवकाने आत्महत्या (Suicide) केली आहे. त्याने याबाबत सविस्तर सुसाईड नोट लिहिली आहे. या प्रकरणातील युवक हा आपल्या सावत्र वडिलांच्या बॅंक खात्यातील पैसे परस्पर काढून व्यवहार करत होता. त्याच्या मैत्रीणीने त्याच्याकडे पैसे मागितल्यानंतर त्याने आपल्या मैत्रणीला 70 लाख आणि 10 तोळे सोन्याचे दागिने दिले. बॅंक खात्यातील पैशांचा आपल्या परस्पर व्यवहार झाला आहे हे वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी सावत्र मुलगा आण त्याची मैत्रीण दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावत्र वडिलांची असलेली अमाप संपत्ती गर्लफ्रेंडवर (Girlfriend) उधळणाऱ्या तरुणाने जेव्हा गर्लफ्रेंडकडे परत पैसे मागितले तेव्हा त्याला त्या तरुणीने त्याच्या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या युवकाने विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणातील युवकाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे.

हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील बादलगडमध्ये राहणाऱ्या 28 वर्षाच्या विक्रमचे शेफाली नावाच्या मुलीची ओळख झाल्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईने शेफालीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

वडिलांच्या खात्यातून उखळले पैसे

विक्रमने शेफाली नावाच्या मुलीला प्रेमाखातर 70 लाख आणि 10 तोळे सोने दिले होते. विक्रमचे सावत्र वडिलांना आपल्या संपत्तीत काही तरी घोटाळा झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

युवकाची दोन्हीकडून फसवणूक

वडिलांनी पोलीस दाखल करताच विक्रमने शेफालीकडे पैशांचा तगादा लावला. पैसे देण्यास नकार देत तिने त्याच्या बलात्काराचा गुन्हा केल्याचा आरोप लावत पोलिसात जाण्याची भीती दाखवली.
आपल्याला दोन्हीकडून फसवले गेल्याचे त्याला समजताच 25 जानेवारीला आपल्या सावत्र वडिलांच्या दुकानात त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. यावेळी मिळालेल्या त्याच्या सुसाइड नोटवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मित्र-मैत्रीणी दोघेही गुन्हेगार

विक्रम आणि शेफाली या दोघांविरोधातही या आधीच विक्रमच्या वडिलांनी फसवणूक करून लाखो रुपयेे लुटल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्या दोघांवर पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे विक्रम हा दोन्हीकडून अडचणीत आला होता. वडिलांंच्या खात्यातून परस्पर पैसे काढून ते खर्च केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Wine in Maharashtra: किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Gold price : खरेदीदारासांठी गूड न्यूज; मुंबईसह पुण्यात सोन्याचे भाव गडगडले, जाणून घ्या आजचे भाव…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें