चंद्रपुरात गँग्स ऑफ वासेपूरची पुनरावृत्ती, एका मर्डरचा उलगडा!

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात काल (रविवार) झालेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

चंद्रपुरात गँग्स ऑफ वासेपूरची पुनरावृत्ती, एका मर्डरचा उलगडा!
Shot-dead

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा शहरात काल (रविवार) झालेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड या सरकारी कोळसा कंपनीतील कोळसा व्यवसायातील स्पर्धेतून आरोपी आणि मृतक यांच्यात वाद उद्भवले होते. ही हत्या प्रतिस्पर्ध्याचा सूड घेण्याच्या उद्देशाने केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. (Gangs of Wasseypur style murder in chandrapur, Police arrested two accused)

दरम्यान, याप्रकरणी चंदनसिंह ठाकूर आणि सत्येंद्र सिंह नामक दोन कोळसा व्यावसायिक आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी 9 एम एम पिस्तूलासारख्या देशी बनावटीच्या कट्ट्यातून 4 गोळ्या झाडून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा हत्येनंतर अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी हत्याकांडाचे रहस्य उलगडले आहे. या हत्याकांडात अन्य कोणाचा सहभाग आहे का? पोलीस याचा तपास करत आहेत.

हात एकमेकांना ओढणीने बांधले, नागपुरात 12 वर्षांच्या मुलीसह पती-पत्नीची आत्महत्या

नागपुरात एका पती-पत्नीने मुलीसह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक (Nagpur Family Commit Suicide) घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली. जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये या कुटुंबाने आत्महत्या केली (Nagpur Family Commit Suicide). नागपूर जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये एका दाम्पत्याने मुलीसह सामूहिक आत्महत्या केली. श्याम गजानन नारनवरे (वय 46), सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी तिघांची नावे आहेत. हे दाम्पत्य नागपूरच्या वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्राजवळ दुचाकी उभी असल्यानं स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनालस्थळ गाठलं. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढले. यावेळी तिघांचे हात एकमेकांना ओढणीने बांधलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या तिघांनी एकत्र सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. तरीही या तिघांनी आत्महत्येसारखं टोकांचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी वेलतूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय.

हेही वाचा

छत्तीसगडच्या माजी मंत्र्याच्या सून आणि नातीची हत्या, बंद घरात मृतदेह सापडले

आधी हत्या, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; माजी नगरेवकाच्या आईच्या खुनामुळे परिसरात खळबळ

(Gangs of Wasseypur style murder in chandrapur, Police arrested two accused)

Published On - 4:35 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI