‘दादा तुमच्यावर भरपूर प्रेम करतो’, म्हणून विवाहितेने नवऱ्याला सोडलं, पण नंतर तोच सत्यम असा वागला की…
जेव्हा ती सत्यमच्या बहिणीला भेटली, त्यावेळी ती म्हणाली की, दादा तुमच्यावर भरपूर प्रेम करतो. म्हणून विवाहितेने नवरा, पदरात दोन मुलं आहेत, याचा मागचा पुढचा विचार केला नाही. थेट नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेतला. पण नंतर त्याच सत्यमने असत्याच असं रुप दाखवलं की, पायाखालची जमीन सरकली.

एक विवाहित महिला पदरात दोन मुलं असताना एका युवकाच्या प्रेमात पडली. पतीसोबत राहत असतानाही ती युवकासोबत बोलायची. त्यानंतर युवकाने आणि त्याच्या बहिणीने महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. महिलेने नवऱ्याला घटस्फोट दिल्याशिवाय युवकाशी लग्न केलं. सदर महिला उत्तराखंडची राहणारी असून ती उत्तर प्रदेश गाजीपूर येथे राहणाऱ्या युवकाच्या प्रेमात पडली. दुसऱ्या लग्नानंतर ती रहायला लखनऊला गेली. काही महिन्यांनी युवकाचे नातेवाईक तिला धमकावू लागले. पैशांच आमिष दाखवून युवकाला सोडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. पण महिला ऐकत नव्हती, तेव्हा तिला धमकावण्यात आले. नंतर युवकच महिलेला सोडून आपल्या गावी निघून गेला. हे संपूर्ण प्रकरण गाजीपूर भांवरकोल पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. युवक भांवरकोलच्या सोनाडी गावात राहतो. त्याचं नाव सत्यम आहे.
महिलेने गाजीपूरच्या भांवरकोल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिला सहारनपूर जिल्ह्यातील राहणारी आहे. उत्तराखंडच्या बुगवाला गावात पती आणि दोन मुलांसह ती भाड्याच्या घरात रहायची. त्याचवेळी सत्यम सोबत तिचं बोलण सुरु झालं. पतीपासून लपून छपून तिचा हा संवाद सुरु होता. पण एकदिवस नवऱ्याला सत्य समजलं.
दादा तुमच्यावर भरपूर प्रेम करतो
त्याने पत्नीला सत्यमसोबत बोलण्यापासून रोखलं. पण सत्यम तिला धमकी देऊ लागला. तुझ्या दोन मुलांसोबत तुझ्या नवऱ्याला मारुन टाकेन. सत्यमने महिलेकडे तिचे दागिने मागितले. बोलला की त्याची बहिण आजारी आहे. सत्यमने धमकावल्याने महिलेने तिचे सर्व दागिने सत्यमला देऊन टाकले. जेव्हा ती सत्यमच्या बहिणीला भेटली, त्यावेळी ती म्हणाली की, दादा तुमच्यावर भरपूर प्रेम करतो.
नवऱ्याबरोबर घटस्फोट झाला की, कायदेशीर लग्न लावून देऊ
सत्यमने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करण्यात कायदेशीर अडचणी होत्या. त्यावेळी सत्यमची बहिण तिला बोलली की, तू आमच्याजवळ ये. तुमच्या दोघांच मंदिरात लग्न लावून देईन. नंतर नवऱ्याबरोबर घटस्फोट झाला की, कायदेशीर लग्न लावून देईन. त्यानंतर युवकाच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत वाराणसीच्या कामाख्या मंदिरात पूर्ण रितीरिवाजाने दोघांच लग्न झालं.
7 महिन्यांची प्रेग्नेंट
लग्नानंतर सत्यम महिलेला घेऊन लखनऊला भाड्याच्या घरात राहू लागला. काही महिन्यानंतर सत्यमचे वडिल आणि काका त्याच्या घरी आले. त्यांनी महिलेला पाच लाखाच आमिष देऊन सत्यमला सोडायला सांगितलं. पण तिने नकार दिला. महिलेने सांगितलं, की ती 7 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्यानंतर सत्यमच्या काकांनी तिला संपवण्याची धमकी दिली.
शिव्या देऊन तिला घरातून हाकललं
काही दिवसांनी सत्यम महिलेला सोडून आपल्या गावी निघून गेला. जेव्हा ती सत्यमचा शोध घेत त्याच्या घरापर्यंत पोहोचली, त्यावेळी सत्यमच्या वडिलांनी तिला तिथून निघून जायला सांगितलं. तुला आम्ही ठेऊन घेणार नाही असं ते म्हणाले. शिव्या देऊन तिला घरातून हाकललं. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केलाय.
