
कल्याणमधील एका रुग्णालयात स्वागतिका असलेल्या मराठी तरुणाला गोकुळ झा याने बेदम मारहाण केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर केला असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण त्याचा माज कायम आहे. त्याने अटकेनंतर पोलिसांवर अरेरावी केली. कोर्टात गोंधळ घातला आणि आता तर पत्रकारांनाच त्याने धमकी दिली. तुम्हाला बाहेर आल्यावर पाहतो, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे त्याचा पोलिसी पाहुणचार संपला नाही का? असा संतप्त सावल मराठी प्रेमी विचारत आहेत. त्याला कुणाचे इतके पाठबळ आहे की तो पोलीस, न्यायपालिकेला सुद्धा जुमानत नाही, असा सवाल करण्यात येत आहे.
परत तुम्हाला भेटतो
मराठी तरुणीला मारहाण प्रकरणात गोकुळ झा याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी गोकुळ झा हा दोन दिवसा पोलिस कोठडीत होता. दरम्यान त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा पोलिसांसमोरच पत्रकारांना आरोपी गोकुळ झा कडून धमकी देण्यात आली. परत तुम्हला भेटतो, अशी धमकी त्याने दिली. यापूर्वी त्याने पोलिसांवर अरेरावी केली होती. तर न्यायालयातही त्याने गोंधळ केला होता.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
कल्याण कोळपेवाडी तरुणी मारहाण प्रकरणात आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कल्याण सत्र न्यायालयात प्रकरणात सुनावणी झाली. दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत मुख्य आरोपी मानपाडा मध्ये याआधी दाखल असलेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांना आरोपीचा ताबा घेण्याची परवानगी दिली.
आरोपीला सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती करण्यात आली होती. तर प्रकरणात दुसरा कोणताच वेगळा तपास करायचा नसल्याने गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी न देण्याचा युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीअंती आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपीचा भाऊ रणजीत झा याचा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून थोड्या वेळातच त्या अर्जावरती सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे फिर्यादीचे वकील हरीश नायर यांनी पोलिसांवरती राजकीय दबाव असल्यामुळे तपास होत नसल्याचे खंत व्यक्त करत आरोपी सुटला तर मुलीच्या आणि त्यांच्या बहिणीच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात हा आरोपी फरार असून न्यायालयाने ताब्यात घेण्याची परवानगी दिली असून आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली.