AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलानेच घेतला आईचा जीव, रागात आला अन्…हत्येचं कारण वाचून व्हाल अचंबित!

गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलानेच आपल्या आईचा गला घोटून जीव घेतल्याचं समोर आलंय.

अल्पवयीन मुलानेच घेतला आईचा जीव, रागात आला अन्...हत्येचं कारण वाचून व्हाल अचंबित!
gondia crime news
| Updated on: Jul 01, 2025 | 2:49 PM
Share

Gondia Crime News : आजघडीला सामाजिक मन चांगलेच कलुषित झाले आहे. मृत्यू, हत्या, हल्ल्याच्या अनेक धक्कादायक घटना रोज घडत आहेत. गोंदिया जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने चक्क आपल्या आईचाच जीव घेतलाय. खर्चासाठी पैसे न दिल्याने या अल्पवयीन पोराने आपल्या आईचा गळा घोटून हत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस तपासात मुलानेच आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

मुलाविरोधात गुन्हा दाखल

गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील भारती सहारे (44) यांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून आईचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्या 17 वर्षीय मुलावर रावणवाडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार भारती सहारे गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आपल्या 17 वर्षीय मुलासोबत राहत होत्या. पतीच्या निधनानंतर गावातच अंडी विकून त्या आपला उदरनिर्वाह करायच्या. भारती यांना त्यांचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत मागायचा. 26 जूनच्या रात्रीही असेच या अल्पवयीन मुलाने आपल्या आईला खर्चासाठी पैसे मागितले. पण यावरून पुढे दोघांत वाद झाला.

डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला म्हणून…

माय-लेकांमध्ये झालेला हा वाद नंतर वाढत घेला. याच वादात रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले. यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून संबंधित महिलेचा मृत्यू झाला. नंतर त्या अल्पवयीन मुलाने नातेवाईकांना आईच्या मृत्यू नैसर्गिक झाला असे सांगून अंत्यसंस्कार केले.

पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन् बिंग फुटले…

मात्र, संशय आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. या तपासाअंतर्गत पोलिसांनी मृत महिलेचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढले. त्यानंतर या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या संपूर्ण तपासानंतर मृत महिलेच्या खुनाचा उलगडा झाला. अल्पवयीन मुलाचे बिंग फुटले.

अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

सर्व प्रकरण समोर आल्यानंतर रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ