भिंत फोडून दुकानात घुसले आणि ५ लाखांचे मोबाईल पळवले… कुठे घडली ही चोरी ?

चोरीसाठी आजकाल नवनव्या क्लुप्त्यांचा वापर होत आहे. मोबाईल शोरूमच्या मालकालाही असाच चोरीचा एक फटका बसला. या घटनेप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

भिंत फोडून दुकानात घुसले आणि ५ लाखांचे मोबाईल पळवले... कुठे घडली ही चोरी ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 9:26 AM

शाहिद पठाण, टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 3 ऑक्टोबर 2023 : राज्यभरात गुन्ह्यांचे,चोऱ्यांचे सत्र वाढतच चालले आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र चोरही (crime news) दरवेळेस नवनव्या आयडियांचा वापर करून हात साफ करतात. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशाच एका चोरीच्या घटनेमुळे मोबाईल शोरूमच्या (mobile gallery) मालकाला मोठा फटका बसला. गोंदिया येथे ही चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारत ५ लाखांहून अधिक किमतीचा माल (theft case) लुटून नेला.चोरीची ही घटना सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी उघड झाली. मोबाईल गॅलरीची भिंत फोडून आत घुसून चोरट्यांनी मालावर डल्ला मारला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

त्या रात्री नेमकं काय झालं ?

गोंदिया येथील आमगाव मधील पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या शिवणकर चाळीमध्ये एक मोबाईलचे दुकान आहे. दुर्गेश डिगलाल गौतम हे त्या दुकानाचे मालक आहेत. रात्री अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शोरूमची मागची भिंत फोडून आतमध्ये प्रवेश करून चोरी केली. आमगाव येथील गांधी चौक ते कामठा चौक दरम्यान असलेल्या जुन्या पाणी टाकीच्या जवळ शिवणकर चाळीत एका भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये पवार मोबाइल गॅलरी उघडण्यात आली आहे. १ ऑक्टोबरच्या रात्रीस उशीराच्या सुमारास चोरट्यांनी या दुकानाच्या मागच्या बाजूला असलेली भिंत फोडली आणि ते आत घुसले.

त्यांनी या दुकानातून महागडे असे तब्बल 28 मोबाईल पळवले. या सर्व मोबाईल्सची किंमत पाच लाख रुपयांहून अधिक असल्याचे समजते. सोमवारी सकाळी दुकानाचे मालक दुर्गेश पवार हे नेहमीप्रमाणे दुकानु उघडण्यासाठी आले , पण समोरचं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होत, मागील बाजूस असलेली भिंतही फोडण्यात आली, असेही त्यांना दिसले. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाइल वरून आमगाव पोलिस ठाण्यात संपर्क करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी आमगाव पोलिस पुढील तपास करत चोरांचा कसून शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.