AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Crime : शेतात काम करुन घेतले पण पैसे दिले नाही, संतापलेल्या नातवाने आजीसोबत केले ‘हे’ भयंकर कृत्य

पैशासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. पैशापुढे रक्ताच्या नात्याचाही विसर पडतो. अशीच एक घटना सोलापुरातील माढा तालुक्यात घडली आहे.

Solapur Crime : शेतात काम करुन घेतले पण पैसे दिले नाही, संतापलेल्या नातवाने आजीसोबत केले 'हे' भयंकर कृत्य
सोलापूरमध्ये पैशाच्या वादातून नातवाकडून आजीची हत्याImage Credit source: TV9
| Updated on: Aug 07, 2023 | 11:20 AM
Share

सोलापूर / 7 ऑगस्ट 2023 : शेतातील काम करुन घेत कामाचे पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने आजीची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. माढा तालुक्यातील लऊळ गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हर्षद शिंदे असे आरोपी नातवाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आजोबा शेतातून घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी नातू पुण्यात वडिलांसोबत रहात होता. या घटनेमुळे आजी आणि नातवाच्या नात्यालाच काळिमा फासला गेला आहे.

काय आहे प्रकरण?

हर्षद शिंदे हा पुण्यात आई-वडिलांसोबतआई वडील पुण्यात राजगुरुनगर येथे राहत होता. हर्षद माढा तालुक्यातील लऊळ गावी आपल्या आजी-आजोंबाकडे नेहमीप्रमाणे रहायला आला होता. आजी त्याच्याकडून शेतात काम करुन घेतसे. यानंतर उसाचे पैसे आजोबांच्या खात्यात आले होते. ते पैसे काढून मला द्या असे आरोपी सांगत होता. यावरुन नातू आणि आजोबांमध्ये नेहमीच पैशांवरुन भांडण व्हायचे. आजीने दोघांचे भांडण सोडवण्यसाठी मध्यस्थी केली. याचा राग हर्षदच्या मनात खदखदत होता. तसेच आत्याच्या मुलाला आजी जास्त जवळ करत होती.

आजोबा घरी आल्यानंतर घटना उघड

याचा राग मनात धरुन नातवाने चुलीजवळ जेवण करत असलेल्या आजीला बाहेर ओढत नेले. मग तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. दुसऱ्या गावात शेतात मजुरीला गेलेले आजोबा घरी आले तर पत्नी मृतावस्थेत आढळली. यानंतर कुर्डूवाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत चौकशी केली असता नातवाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आजीची हत्या करुन नातू पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.

अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे....
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे.....
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल.
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल.
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ.
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का.
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?.
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला.
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण.
भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी तयार तर काँग्रेसकडे उपरण्याचा दुष्काळ!
भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी तयार तर काँग्रेसकडे उपरण्याचा दुष्काळ!.
'वर्षावरच्या बैठकीत पार्थवरून दादा संतापले सरकारमधून बाहेर पडतो अन्..'
'वर्षावरच्या बैठकीत पार्थवरून दादा संतापले सरकारमधून बाहेर पडतो अन्..'.