फटाके फोडण्यावरुन राडा! धक्काबुक्की, दगडफेक आणि बरंच काही, नेमकी कुठं घडली घटना?

राडा नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज! दिवाळी साजरी करताना कुणी लावलं गालबोट?

फटाके फोडण्यावरुन राडा! धक्काबुक्की, दगडफेक आणि बरंच काही, नेमकी कुठं घडली घटना?
काचेच्या ग्लासात फटाके फोडताना अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 10:31 AM

गुजरात : दिवाळी साजरी करताना (Diwali Celebration) फटक्यांच्या आतषबाजीदरम्यान वडोदरामध्ये (Vadodara) तुफान राडा झाला. फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादाचं रुपांतर आधी बाचाबाचीत झालं. त्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की करणं, मग मारहाण, त्यानंतर दगडफेक करण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करुन धुडगूस घालणाऱ्यांना आवर घालावा लागला होता. या राड्यामुळे एकच तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून चोख बंदोबस्तही आता तैनात करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना वडोदरा येथील पानीघाट परिसरात (Gujrat News) असलेल्या मुस्लिम रुग्णालयाच्या जवळ घडली.

पानीघाट परिसरात दोन गट भिडले असल्याची माहिती वडोदरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केलं आणि धुडगूस घालणाऱ्यांना आवर घातला.

आता याप्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतर तपासाअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

मुस्लिम रुग्णालयाजवळ तरुणांचा एक गट फटाके फोडत होते. त्यावेळी दुसरा एक गट आणि त्यांनी तरुणांच्या पहिल्या गटावर आक्षेप घेतला. यावरुन वाद सुरु झाला. दरम्यान, वाद वाढत असल्याचं पाहून दुसऱ्या गटातून लोकांनी आणखी काहींना बोलावलं आणि मारमारी सुरु केली. यावेळी दगडफेकही करण्यात आल्याचं समोर आलंय.

10 पेक्षा जास्त लोक या राड्यात जखमी झालेत. मात्र याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. पेट्रोल बॉम्बही यावेळी एकमेकांवर फेकण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तर काही दुकानांची आणि गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पोलिसांनी अखेर सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. आतापर्यंत या राड्याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी केली जातेय.

एकीकडे गुजरातच्या वडोदरामध्ये राडा झाला. तर दुसरीकडे राजकोटमध्येही अशाच प्रकारी घटना झाल्याचीही माहिती समोर आली आहे. आता या दोन्ही घटनांप्रकरणी गुजरात पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.