AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी मित्रांसोबत मस्त पार्टी रंगली… नंतर पार्टी थेट पोलीस ठण्यातच गेली, तक्रार दाखल केल्यानं उडाली खळबळ

मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या योगीता यशवंतराव यांनी घरातून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.

घरी मित्रांसोबत मस्त पार्टी रंगली... नंतर पार्टी थेट पोलीस ठण्यातच गेली, तक्रार दाखल केल्यानं उडाली खळबळ
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 07, 2022 | 3:30 PM
Share

नाशिक : नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने एक तक्रार केल्यानं खळबळ उडाली आहे. तक्रारीतील पार्टी आणि त्यानंतर झालेली चोरी सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरात राहणाऱ्या योगीता घनशाम यशवंतराव यांनी ही तक्रार दिला आहे. घरात पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रारीत म्हंटले आहे. तिघांवर हा संशय घेतला असून महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम आणि दागिने चोरीचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. याच तक्रारीची चर्चा आता नाशिक शहरात होऊ लागली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. सायंकाळी सुरू झालेली पार्टी पहाटे पर्यन्त सुरू होती आणि त्याच दरम्यान ही घटना घडल्याचा संशय तक्रारदार महिलेला आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या योगीता यशवंतराव यांनी घरातून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.

यामध्ये योगिता यांचे मित्र प्रियांका कैलास पवार, तेजस रावसाहेब पगारे, विशाल एकनाथ घन यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

यावेळी योगीता यांनी तक्रारीत घरात पार्टी सुरु असताना योगिता या तेजससोबत दोन वेळा बाहेर गेल्‍या आहेत. पहाटेपर्यंत पार्टी चालल्‍यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला आहे.

मुंबई नाका पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गळ्यातील सोन्याची चेन घालण्यासाठी कपाट उघडले असता योगिता यांना कपाट रिकामे असल्‍याचे आढळले असल्याचे म्हंटले आहे.

तक्रारदार योगिता यांनी तिघा मित्रांकडे चौकशी केली असता, याबाबत कुठलीही कल्पना नसल्याचे तिघांनी सांगितले होते.

त्यामुळे योगिता यांनी त्यांनंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत दागिने आणि रोकड चोरीचा संशय व्‍यक्‍त करताना तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केल्याने चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल