IPS वर सब इंस्पेक्टरच्या पत्नीच्या लैंगिक शोषणाचा आरोप, पोलीस दलात एकच खळबळ, व्हिडिओकॉल, आंघोळ धक्कादायक गोष्टी उघड
राष्ट्रपती पदक विजेत्या IPS अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप झाले आहेत. त्याच पोलीस दलात काम करणाऱ्या सब इंस्पेक्टरच्या पत्नीने आरोप केले आहेत. 'मी वॉशरुमला जायचो किंवा आंघोळीला तेव्हा सुद्धा व्हिडिओ कॉल सुरु असायचा' असं डांगी यांनी सांगितलं.

पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आयपीएस अधिकारी रतन लाल डांगी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झालाय. एका सब इंस्पेक्टरच्या पत्नीने चंद्रखुरी पोलीस अकादमीत पदस्थ आयपीएस अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, महिला सतत आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होती. रतन लाल डांगी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी 2011 आयपीएस बॅचचे अधिकारी आनंद छाबडा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. “IPS असो वा IAS आरोप झाला तर चौकशी होणार. आरोप योग्य असले तर कारवाई होणार” असं मुख्यमंत्री विष्णूदेव यांनी सांगितलं.
रतन लाल डांगी 2003 छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. छत्तीसगडमध्ये दोन राष्ट्रपती पदक मिळवणारे पहिले आयपीएस अधिकारी आहेत. राजस्थानच्या नागौरमध्ये त्यांचा जन्म झाला. सरगुजा, दुर्ग, बिलासपूर, रायपूरचे ते आयजी होते. त्यांच्याविरोधात छत्तीसगड पोलीस दलातील सब इंस्पेक्टरच्या पत्नीने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केलाय. पोलीस मुख्यालयात जाऊन डीजीपीकडे लिखित तक्रार केली आहे. दुसरीकडे रतन लाल डांगी यांनी डीजीपींना पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केलीय. चौकशीची मागणी केली आहे. आयपीएस अधिकाऱ्याने जे स्पष्टीकरण दिलय त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, दोघे बऱ्याच काळापासून परस्परांच्या संपर्कात होते. पण आरोपात किती तथ्य आहे, ते चौकशीनंतरच समोर येईल. हिन्दुस्तान वेबसाइटने हे वृत्त दिलय.
स्क्रीन शॉट काढून ते व्हायरल करण्याची धमकी
“एक दिवस महिला माझ्या कार्यालयात विषाची बॉटल घेऊन आली. पत्नीशी संबंध ठेऊ नका म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला. पत्नीच्या जवळ झोपायला मनाई केली. रात्री 10 वाजल्यानंतर बाल्कनीत झोपा. तिथून लाइव्ह लोकेशन मला पाठवायचं. लाइट लावून मला व्हिडिओ कॉल करायला लावायची. सकाळी पाचवाजेपर्यंत व्हिडिओ कॉल सुरु असायचा” असं रतन लाल डांगी यांनी सांगितलं. ‘मी वॉशरुमला जायचो किंवा आंघोळीला तेव्हा सुद्धा व्हिडिओ कॉल सुरु असायचा’ असं डांगी यांनी सांगितलं. “महिलेने व्हिडिओ कॉलच्या क्षणाचे स्क्रीन शॉट काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिलेली. चॅटच्या स्क्रीनशॉट्सचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करायची. मी विरोध केला, तेव्हा सर्वकाही नवऱ्याला सांगण्याची धमकी दिली” असं डांगी म्हणाले.
