AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरणी कामगारांची म्हाडातील घरे स्वस्तात देतो सांगून 21 जणांना 2.30 कोटींना फसवले

मुंबईत स्वस्तात घर मिळतेय म्हणून आपल्या आयुष्याची जमापुंजी म्हाडाच्या दलालांना देणाऱ्यांची फसवणूक झाली आहे.

गिरणी कामगारांची म्हाडातील घरे स्वस्तात देतो सांगून 21 जणांना 2.30 कोटींना फसवले
mhadaImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 24, 2023 | 3:55 PM
Share

मुंबई : प्रभादेवीतील गिरणी कामगारांना मिळालेली म्हाडाची घरे स्वस्तात मिळणार म्हणून त्या 21 जणांनी आपली आयुष्यभराची कमाई दलालांना दिली. अशाप्रकारे सुमारे 2.30 कोटी रूपये घेतल्यानंतर देखील घरे काही मिळाली नसल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दादर पोलीसांनी या प्रकरणात सुनील घाटविसावे तसेच त्याची पत्नी सुजाता, प्रशांत जाधव, बबिता भंगारे, रवी शिगवण आणि सरस्वती लोकरे आदी सहा जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

2017 मध्ये आरोपी सुनील घाटविसावे याने आपली म्हाडा अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असल्याचे सांगत तक्रारदारांना फशी  पाडले. म्हाडाचे सेन्चुरी बाजार येथील मिल कामगारांचे फ्लॅट बाजार भावापेक्षा स्वस्तात मिळवून देण्याचे आमीष दाखवल्याचे दादर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साठे यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले.

आरोपी सुनील घाटविसावेवर विश्वास ठेवून पीडब्ल्यूडी विभागात क्लार्क असलेल्या तक्रारदार दत्तप्रसाद बाईत ( वय 39 ) आणि त्याच्या नातेवाईकांनी एकूण 2.30 कोटी रूपये घाटविसावे याला दिले. एप्रिल 2017  ते नोव्हेंबर 2019 दरम्यान ही रक्कम त्यांनी आरोपी  घाटविसावे याच्याकडे सुपूर्द केली. सुरक्षा म्हणून घाटविसावे याच्या तक्रारदारांनी करार देखील केला. परंतू अखेर शेवटपर्यंत घरे काही मिळाली नाहीत. जेव्हा तक्रारदारांनी पोलीस स्थानक गाठले.

असा विश्वास निर्माण केला 

आरोपींनी आपल्यासह आपल्या नातलगांनाही प्रभादेवीतील सेन्चुरीबाजार म्हाडा कॉलनीत नेले आणि तेथील फ्लॅटही आपल्या दाखविल्याचे तक्रारदार दत्तप्रसाद बाईत यांनी सांगितले. आरोपीनी या सर्व तक्रारदारा म्हाडाच्या कार्यालयात नेऊन त्यांचे बायोमेट्रीक डीटेल्स जमा केले. त्यामुळे तक्रारदारांचा आरोपींवर चांगलाच विश्वास बसला आणि त्यांनी आनंदाने सर्व पैसे भरले.

सर्वसाधारण वर्गातील तक्रारदार

या प्रकरणातील सर्व तक्रारदार सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रकल्पबाधीत आहेत. त्यांना विकासकाने तीस लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली होती. ते पैसे त्यांनी स्वस्तात घर मिळत आहे म्हणून या आरोपींना दिल्याचे सांगण्यात येते. घाटविसावे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा संशय आहे. इतर सर्व जण त्याला मदत करीत होते असे उघडकीस आले आहे. आतापर्यंत पोलीसांनी 38 लाख रूपये हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. पोलीसांनी या प्रकरणात भादंवि कलम 406 , 409 , 420 आणि 34  गुन्हा दाखल केला आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.