‘हॅलो बेबी, मी तुझ्याशी करणार तिसरं लग्न…’ पत्नीचं बोलणं ऐकताच पती खवळला, थेट…त्या घरात काय घडलं ?
बाबुरामची जीवनकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी आहे. त्याने 2009 मध्ये शाहपूर येथील नानकीशी पहिले लग्न केले. त्यांना दोन मुलीही होत्या. परंतु, त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह वाढला आणि नानकी त्याला सोडून गेली. नंतर, 2018 साली, बाबुरामने शांतीशी लग्नगाठ बांधली पण...

प्रेम, संशय आणि विश्वासघात… या तिन्हींची कहाणी आणि त्याचा दु:खद अंत किंवा शेवट आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिला असेल पण प्रत्यक्षातहीअसंच काहीस घडलं ते उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये.. तेथे एका हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये असं काही घडलं ज्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि संसार उद्ध्वस्त झाला. तिथे एका पतीने आपल्या पत्नीचा बोलणं ऐकल्यावर त्याला एवढा रागा आला की आधी त्याने तिला मारलं आणि नंतर स्वत:चंही आयुष्य संपवून टाकलं. य़ा जीवघेण्या कृत्यामागचं कारण म्हणजे त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी वाढते संबंध आणि तिसरे लग्न करण्याची तिची योजना. “हॅलो बेबी, मी तुझ्याशी लग्न करेन…” पत्नीचं मोबाईल फोनवरचं हे बोलणं ऐकून हे ऐकून पतीचे रक्त खवळले. रागाच्या भरात त्याने आधी पत्नीचा गळा दाबला आणि नंतर त्याच स्कार्फने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले.
संशयापासून सुरुवात आणि खुनाने शेवट
कानपूर जिल्ह्यातील बांबुरीहा गावातील रहिवासी बाबुराम गौतम यांनी एका रात्री घरातले सर्वजण झोपलेले असताना हे पाऊल उचलले. त्यांची पत्नी शांती गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या पुरुषाशी बोलत होती. बाबुरामने तिला अनेक वेळा अडवले, पण शांती नेहमीच त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. अखेर त्या रात्री उशिरापर्यंत दोघांमधील भांडण वाढत गेले, आवाज अधिकच वाढले आणि नंतर सर्व काही कायमचे संपलं. सकाळी, जेव्हा मुलांना त्यांची आई जमिनीवर मृतावस्थेत आणि त्यांचे वडील छताच्या तुळईला लटकलेले आढळले, तेव्हा त्यांनी टाहो फोडला. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरी धावत आले आणि समोरचं दृश्य पाहून स्तब्ध झाले. कोणीतरी कसाबास धीर करत पोलिसांना याबद्दल कळवलं.
पहिलं लग्न तुटलं, दुसऱ्याचीही तीच अवस्था
मृत बाबुरामची जीवनकथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे. त्याने 2009 मध्ये शाहपूर येथील नानकीशी पहिले लग्न केले. त्यांना चंदन आणि लाली या दोन मुली होत्या. परंतु, त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह वाढला आणि नानकी त्याला सुमारे नऊ वर्षांपूर्वी सोडून गेली. नंतर, 2018 साली, बाबुरामने महाराजपूर पोलिस स्टेशन परिसरातील सारसुल येथील रहिवासी शांतीशी दुसरे लग्न केले. या जोडप्याला अंकुश आणि अर्पित हे दोन मुलगे आणि नित्या ही एक मुलगी आहे. काही काळ सर्व काही ठीक चाललं होतं, मात्र हळूहळू हे नातं देखील तुटू लागलं. कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून शांती एका अनोळखी व्यक्तीशी फोनवर बराच वेळ बोलायची, गप्पा मारायची. बाबुरामने तिला थांबवण्याचा , रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती म्हणाली की आता मी त्याच्याशी लग्न करणाप. तिने बाबूरामसोबत राहण्यास नकार दिला, यामुळे तो बिथरला.
रात्री भांडण, सकाळी सगळंच संपलं
मृताची मुलगी लाली हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी संध्याकाळी माझ्या आईवडिलांचे खूप भांडण झाले. माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितले की, त्या मुलाशी आता बोलू नको. पण माझी आई म्हणाली की, ‘मी आता त्याच्याशीच लग्न करेन.'” त्यानंतर, माझे वडील शांत झाले. आम्ही सर्वांनी जेवण केले आणि झोपी गेलो. सकाळी उठून पाहिलं तर काय, आई जमिनीवर पडलेली होती आणि वडील छताला लटकलेले आढळले”. त्या मुलींचा आरडा-ओरडा ऐकून शेजारी जमा झाले. कोणीतरी ताबडतोब 112 ला फोन केला. काही वेळातच, एसीपी चकेरी पूर्व अभिषेक कुमार पांडे, पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. तपासादरम्यान शांतीच्या मानेवर स्कार्फचे निशाण आढळून आले. प्रथम पत्नीची हत्या करण्यात आली आणि नंतर पती बाबूरामने त्याच स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी मृताचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. एसीपी अभिषेक पांडे यांनी सांगितले की, कॉल डिटेल्सवरून स्पष्ट होते की घटनेच्या रात्री मृत महिलेला त्याच तरुणाचा फोन आला होता ज्याच्याशी ती काही काळ संपर्कात होती. आम्ही त्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी कॉल रेकॉर्ड तपासत आहोत.
तिसऱ्या लग्नामुळे गेला जीव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शांती ज्या तरुणाशी संपर्क साधत होता तो घाटमपूरचा होता. दोघांमध्ये जवळीक वाढली होती आणि ते लवकरच लग्न करण्याबद्दल बोलत होते. हे ऐकून बाबुराम भडकला आणि म्हणाला, “माझ्या पहिल्या पत्नीला सोडून दिल्यानंतर मी तुला स्वीकारलं, मी तीन मुलांचा बाप आहे आणि तू तिसऱ्या लग्नाबद्दल बोलत आहेस?” त्यावर पत्नीने उत्तर दिले, “हो, मी (लग्न) करेन.” हे शब्द बाबुरामच्या हृदयात बाणासारखे घुसले आणि त्यामुळेच त्याने दोघांचे आयुष्य संपवले. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
