AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेछूट गोळीबार… तलवारीने सपासप वार… काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू… 2 जण गंभीर जखमी… हॉटेलमध्ये रात्री नक्की काय घडलं?

मित्रांसोबत पार्टी करणं काँग्रेस नेत्याला महागात पडलं आहे... पार्टीत झालेल्या बेछूट गोळीबारामुळे काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला असून, तलवारीने सपासप वार केल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत... पोलीस याप्रकरणी सध्या कसून चौकशी करत आहेत...

बेछूट गोळीबार... तलवारीने सपासप वार... काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू...  2 जण गंभीर जखमी... हॉटेलमध्ये रात्री नक्की काय घडलं?
Aashu Puri
| Updated on: Nov 21, 2025 | 1:22 PM
Share

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये बेछूट गोळीबार आणि तलवारीने सपासप वार करण्यात आले. ज्यामध्ये काँग्रेस युवा नेत्याचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण गंभीर जखमी आहे… याप्रकरणी पोलीस तपास करत असून, सीटीटीव्ही फुटेज देखील तपासत आहे… लाल सिंगी येथील एका हॉटेलबाहेर वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान दोन गटांमध्ये गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आले. यामध्ये संतोषगड येथील युवा काँग्रेस नेते आशु पुरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या गटातील लोकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसचे माजी ब्लॉक अध्यक्ष गुरजीत सिंग मान आणि त्यांचे दोन सहकारी परमिंदर सिंग आणि पुरजिंदर सिंग यांच्यावर या हत्येचा आरोप आहे.

पोलिसांनी मृत आशु पुरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तांडा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे. संशयित तिघांव्यतिरिक्त पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. परविंदर सिंगने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, बहदला येथील रहिवासी आकाशने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री लाल सिंगी येथील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती, जिथे पुरजिंदर सिंगचा वाढदिवसही साजरा करण्यात आला होता. पार्टी दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. हा वाद हॉटेलच्या बाहेर आला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी देखली झाली.

आकाश याने केलेल्या आरोपांनुसार, गुरजीत सिंगने परमिंदर सिंगला आशु पुरी यांच्यावर गोळीबार करण्यास प्रवृत्त केलं, त्यानंतर आशु पुरी यांच्या डोक्यात गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्यामुळे आशु पुरी यांचं जागीच निधन झालं. गोळीच्या जखमांमुळे रक्तस्त्राव झालेले आशु आणि दुसऱ्या गटातील पुरजिंदर आणि परमिंदर यांना ताबडतोब उना येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे आशु पुरी यांना मृत घोषित करण्यात आलं.

पोलिस अधीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेप्रकरणी तीन जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आशू पुरी यांना लागल्या 4 गोळ्या

घटना घडल्यनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटूज तपास आहे. ज्यामध्ये आतापर्यंत असं समोर आलं आहे की, संतोषगडच्या तरुण काँग्रेस नेत्याला एक नाही तर त्याहून अधिक गोळ्या लागल्या आहेत. काँग्रेस युवा नेत्याला दोन गोळ्या डोक्यात आणि दोन गोळ्या गळ्या शेजारी मारल्या आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार गोळ्यांबद्दल स्पष्ट माहिती मिळेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...