AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honor Killng : तुमची मुलगी आम्हाला लागत नाही… गावाकडे जातानाच मुलगी आणि तिच्या प्रियकरासोबत मोठं कांड, विहिरीजवळच… महाराष्ट्र हादरला

Nanded Honor Killing Case : नांदेडमध्ये ऑनर किलिंगची एक भयंकर घटना घडल्याचे उघडकीस आलं आहे. तिथे एका इसमाने त्याच्याच पोटच्या विवाहीत लेकीसह तिच्या प्रियकराला संपवलं. एवढंच नव्हे तर त्याने त्यांचे मृतदेह विहीरीतही फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Honor Killng : तुमची मुलगी आम्हाला लागत नाही… गावाकडे जातानाच मुलगी आणि तिच्या प्रियकरासोबत मोठं कांड, विहिरीजवळच… महाराष्ट्र हादरला
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 26, 2025 | 8:37 AM
Share

आई-वडिलांसाठी त्यांची मुलं अतिशय प्रिय असतात, त्यांच्या काळजाचा तुकडाच जणू. त्यांच्यासाठी ते काहीही करू शकतात, मुलांसाठी आई-वडिलांनी केलेला त्याग, प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण नांदेडमध्ये एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय की त्यामुळे फक्त नांदेडच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. नांदेडमध्ये ऑनर किलींगची, भयानका हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. तिथे एका इसमाने त्याच्याच पोटच्या विवाहीत लेकीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला . वडिलांवी मुलगी आणि प्रियकराचे हातपाय बांधून त्यांना क्रूरपणे विहीरीत फेकून दिलं.

यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच रपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहीरीतून मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला, आणि ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांसह तीन जणांना बेड्या ठोकून अटक केली. आरोपींमध्ये तिच्या काकांचा आणि आजोबांचाही समावेश आहे.

तुमची मुलगी आम्हाला लागत नाहीत घरी घेऊन जा

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील ही हादरवणारी घटना आहे. संजीवनी सुधाकर कमळे (वय 19) आणि लखन बालाजी भंडारे (वय 19) अशी दोन्ही मृतांची नावं आहेत. संजीवनी विवाहीत होती तर लखनचं लग्न झालं नव्हतं. मात विवाहीत संजीवनीचे लखनशी प्रेमसंबंध होते. सोमवारी तो तिला भेटायला तिच्या सासरी गेला होता.

तेव्हा सासरच्या लोकांनी संजीवनी आणि लखन या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि ते पाहून ते संतापले. त्यांनी लखनला पकडून ठेवले आणि संजीवनीच्या वडिलांना, मारुती सुरणे यांना तिथे बोलावलं. मुलीच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजताच मारूती लागलीच तिथे आले . तुमची मुलगी आम्हाला लागत नाहीत, तिला घरी घेऊन जा असं सागंत सासरच्या लोकांनी तक्रार करत तिला परत पाठवलं. संतप्त मारूती हे संजीवनी आणि तिच्या प्रियाकराला घेऊन गावाकडे गेले. यावेळी त्यांच्यासोबत मुलीचे काका आणि आजोबाही होते.

झालेल्या प्रकारामुळे संतप्त मारूती यांनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराचा हातपाय बांधले आणि त्यांना विहीरात फेकून दिलं, त्यांचा खून केला. नंतर त्यांनी स्वत:च पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या घटनेची कबूली दिली.यानंतप पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली. तसेच घटनास्थळ गाठून रात्री 12 वाजेपर्यंत मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा, दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.