जेवणाची चव चांगली नाही म्हणाला, संतप्त हॉटेल मालकाने ग्राहकावर गरम तेल फेकले !

ओडिसातील कटक शहरातील बालीचंद्रपूर गावात राहणारे प्रसनजीत परिदा शनिवारी गावातील एका भोजनालयात जेवायला गेले होते. प्रसनजीत यांनी आपले जेवण ऑर्डर केले. मात्र जेवण जेवले असता त्यांना जेवणाची चव आवडली नाही.

जेवणाची चव चांगली नाही म्हणाला, संतप्त हॉटेल मालकाने ग्राहकावर गरम तेल फेकले !
जेवणावरुन झालेल्या वादातून हॉटेल मालकाकडून ग्राहकावर हल्लाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 1:43 PM

कटक : जेवणाची चागंली नाही सांगितले म्हणून संतापलेल्या हॉटेल मालकाने ग्राहकांवर उकळते तेल (Hot Oil) फेकल्याची धक्कादायक घटना ओडिसातील कटक शहरात घडली आहे. या घटनेत ग्राहक गंभीर भाजला (Major Burned) आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आरोपी हॉटेल मालक फरार (Hotel Owner Absconding) झाला आहे. पोलिसांनी गु्न्ह्याची नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

ओडिसातील कटक शहरातील बालीचंद्रपूर गावात राहणारे प्रसनजीत परिदा शनिवारी गावातील एका भोजनालयात जेवायला गेले होते. प्रसनजीत यांनी आपले जेवण ऑर्डर केले. मात्र जेवण जेवले असता त्यांना जेवणाची चव आवडली नाही.

ग्राहकाने जेवणाला चांगली चव नसल्याचे सांगितले

प्रसनजीत यांनी हॉटेल मालकाला जेवण चांगले नसल्याची तक्रार केली. आपल्या हॉटेलमधील जेवणाबाबत नकारात्म्क प्रतिक्रिया दिल्याने हॉटेल मालक संतापला. यानंतर हॉटेल मालक प्रवाकर साहू आणि प्रसनजीत यांच्यात जोरदार वादावादी सुरु झाली. हळूहळू या वादावादीचे हाणामारीत रुपांतर झाले.

हे सुद्धा वाचा

संतप्त हॉटेल मालकाने गरम तेल अंगावर फेकले

यानंतर रागाच्या भरात प्रवाकर साहूने गरम तेल प्रसनजीतवर टाकले. यात ते गंभीर भाजले. यानंतर तेथे उपस्थिक लोकांनी तात्काळ त्यांना कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेले. प्रसनजीत यांच्या चेहरा, मान, छाती, पोट आणि हाताला गंभीर भाजले आहे.

पोलिसांकडून फरार हॉटेल मालकाचा शोध सुरु

याप्रकरणी बालीचंद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे बालीचंद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत मुदुली यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.