शिकाऱ्याने घोरपडीवर केला बलात्कार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून वनविभाग चक्रावलं

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे येथील गाभा क्षेत्रात हत्यार घेऊन फिरणाऱ्या संदीप तुकाराम पवार हातीव गोठणे, मंगेश जनार्धन कामतेकर, अक्षय सुनील कामतेकर गुरववाडी ता. संगमेश्वर या तीन शिकाऱ्यांना वन्यजीव अधिकाऱ्यांनी (Wildlife Officer) अटक केली आहे. हे तिन्ही शिकारी नजीकच्या भागातील गावकरी आहेत.

शिकाऱ्याने घोरपडीवर केला बलात्कार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून वनविभाग चक्रावलं
शिकाऱ्याने घोरपडीवर केला बलात्कारImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 6:00 AM

सांगली – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे येथील गाभा क्षेत्रात हत्यार घेऊन फिरणाऱ्या संदीप तुकाराम पवार हातीव गोठणे, मंगेश जनार्धन कामतेकर, अक्षय सुनील कामतेकर गुरववाडी ता. संगमेश्वर या तीन शिकाऱ्यांना वन्यजीव अधिकाऱ्यांनी (Wildlife Officer) अटक केली आहे. हे तिन्ही शिकारी नजीकच्या भागातील गावकरी आहेत. ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती या तीन आरोपीपैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर बलात्कार (Rape on Reptile) केल्याची धक्कादायक माहिती तपास करणाऱ्या वनाधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल अधिकाऱ्यांनी घेतली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. घोरपडी (Reptile) सारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत संभोग करण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.

मोबाईल घेतल्याने शोध लागला

व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यात 31 मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी जंगलात जात असल्याचे वनरक्षकांनी पाहिले. त्यांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करून तिघा आरोपींना ताब्यात घेतले. एक आरोपी हातिव गावातून तर दोन आरोपींना रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपींचे मोबाईलही वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

आरोपीची कसून चौकशी होणार

तिन्ही आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडीवरती बलात्कार केल्याचा चित्रीत व्हिडिओ वनाधिकाऱ्यांच्या हाती लागला. घाणेरडं कृत्य करताना आरोपीच्या मोबाईलमधून त्याचे चित्रीकरणही केले जात होते. ती घोरपड या घृणास्पद कृत्यानंतर जिवंत राहिली का ? आरोपीने इतर कोणत्या वन्यप्राण्यासोबत बलात्कार केला आहे का ? याबाबतची चौकशी सुरु असल्याची माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली. वन्यप्राण्यांसोबत घाणेरडं कृत्य करणे ही फारच विचित्र घटना आहे. ही घटना मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जाईल. अशी माहिती विभागीय वनाधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यान विशाल माळी सांगितली.

सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद

देशातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांना विविध वर्गवारीत संरक्षण दिले जाते. वाघ आणि सिंहा प्रमाणेच घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत पहिल्या वर्गवारील संरक्षित आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार किंवा अवैधरित्या तस्करी करणा-याला सात वर्षे सक्त तुरुंगवासाची तरतूद कायद्यांतर्गत आहे.

पवारांच्या घरावरील राड्यानंतर जयंत पाटलांचं प्रवीण दरेकरांकडे बोट? कुणाचं नाव घेत नसल्याचंही आवर्जुन सांगितलं!

Sharad Pawar : पवारांच्या घरावरील राड्यानंतर विश्वास नांगरे पाटलांची मोठी कारवाई, झोन 2 चे DCP योगेश कुमार यांची उचलबांगडी

Maharashtra Corona Update : सांताक्रुझमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती, खबरदारीच्या केंद्राच्या सूचना

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.