एका दारूच्या बाटलीसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या, पतीने आपल्याच पत्नीच्या खासगी क्षणाचा व्हिडीओ काढला अन्…
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, पीडितेला प्रचंड धक्का बसला आहे.

हरियाणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. ही घटना पानीपत येथील असून, या घटनेमुळे माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. पतीनं पैशांसाठी आपल्या पत्नीचं आयुष्य बरबाद केलं आहे. त्याने आपल्या पत्नीला आपल्या मित्रांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पत्नीने या गोष्टीला विरोध केला, त्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या खासगी क्षणाचे व्हिडीओ एक बनावट अकाउंट तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या पीडित महिलेचं लग्न 2020 मध्ये पानीपतचा रहिवासी असलेल्या पंकज नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. मात्र त्यानंतर लवकरच पतीचा खरा चेहरा समोर आला, या घटनेमुळे पीडितेला मोठा धक्का बसला, आरोपी पतीला सट्टा आणि दारूचं व्यसन होतं. यासाठी त्याला पैशांची गरज होती, त्यासाठी तो आपल्या पत्नीच्या कुटुंबाकडे पैशांची वारंवार मागणी करू लागला. छोट्या -छोट्या गोष्टींवरून तिला मारहाण करू लागला. तिला शिवीगाळ करू लागला. दिवसेंदिवस या महिलेची परिस्थिती खालावत चालली होती. त्याचा फक्त एकच उद्देश होता, दारू आणि सट्ट्यासाठी पैसा जमा करायचा. त्यासाठी तो काहीही करायला तयार होता.
पैशांसाठी त्याने सगळी हद्द पार केली, त्याने आपल्या पत्नीला पैशांसाठी मित्रांसोबत झोपण्यास सांगितले. तो वारंवार आपल्या मित्रांना घरी बोलू लागला. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की जर तुला या घरात राहायचे असेल तर माझ्या मित्रांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतील. तुला माझ्या मित्रांसोबत झोपावं लागेल. आपल्या पत्नीच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा त्याचा इरादा होता. मात्र पीडितेनं या सर्व गोष्टी करण्यास नकार दिला, त्यानंतर तर कळसच गाठला, आपल्याच पत्नीच्या खासगी क्षणाचे व्हिडीओ चित्रीत केले आणि एक फेक अकाऊंट तयार करून ते व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले.
काहीही करून पैसा कमवायचा, त्यातून आपलं व्यसन पूर्ण करायचं एवढंच तो काम करत होता. जेव्हा पीडितेनं या सर्व गोष्टींना विरोध केला, तेव्हा त्याने पीडितेला आणि तिच्या मुलीला घराबाहेर काढलं आहे, या प्रकरणात पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
