तुझं लग्न होऊ देणार नाही, आयुष्य बरबाद करेन… बायकोच्याच बहिणीला धमकावलं, जिजाजींनी असं का केलं ?
साहेब! माझे जीजाजी मला WhatsApp वर घाणेरडे मेसेज पाठवतात. मी विरोध केला तर ते धमक्याही देत आहेत. त्याने माझ्या वडिलांना माझा मॉर्फ केलेला फोटो पाठवलाय. एवढचं नव्हे तर तो माझ्या बहिणीला... एका तरूणीच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या तक्रारीने अख्खं पोलीस स्टेशन हादरलं.

‘साली होती है आधी घरवाली..’ असं मजेत म्हटलं जातं. लग्नानंतर जीजाजी आणि मेव्हणीचं नातं मजेच, खोडकर पण तितकचं प्रेमळही असतं. पण याच नात्याला नको ते वळण देण्याचा प्रयत्न झाला तर ? उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका मेव्हमीने तिच्या बहिणीच्या पतीवर अर्थात तिच्या जीजाजींवर गंभीर आरोप लावले आहेत. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचे जीजाजी तिला WhatsApp अश्लील मेसेज पाठवत होते. त्यानंतर तरूणीने जेव्हा त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिला थेट धमकावण्याचा प्रयत्न केला. मी तुझं आयुष्य बरबाद करेन, अशी धमकीही त्याने दिली. या सगळ्यामुळे घाबरलेल्या तरूणीने पोलिसांकडे धाव घेत त्यांची मदत मागितली. याप्रकरणी सुभाषनंगप पोलिसांनी आरोपीसह 2 जणांविरोधात FIR दाखल केली आहे.
नेमकं काय झालं ?
पीडितेने पोलिसांना सांगितलं, “साहेब! माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न गाझियाबादमध्ये झाले आहे. लग्नानंतर काही काळापासून माझ्या मेहुण्याचे वर्तन अतिशय वाईट आहे. हळूहळू त्यांनी मला त्रास देण्यास सुरूवात केली. सुरूवातीला ते मा फोन करून आणि WhatsApp वर घाणेरडं, अश्ली बोलायचं. आधी मला वाटलं की ते फक्त मजा करत आहेत. पण दिवसेंदिस त्यांचं हे घाणेरडं वागणं वाढू लागलं. अखेर मी त्यांना विरोध केला. पण मी त्यांना टोकल्यावर त्यांनी मला थेट धमकीच देण्यास सुरूवात केली ” अशा शब्दातं पीडीतेने तिची आपबीती सांगितली.
फोटो एडिट करून व्हायरल करण्याची धमकी
पीडित तरूणीने पोलिसांना सांगितलं की, आरोपी मेहुण्याने तिचे काही फोटो एडिट करून ते आक्षेपार्ह बनवले होते. त्यानंतर त्याने ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. जर तू माझी आज्ञा पाळली नाही तर ते फोटो सर्वांना पाठवेन आणि तुझी बदनामी करेन, असं त्याने तिला धमकावलं. एवढंच नव्हे, तर तुझं लग्न कुठेही होऊ देणार नाही, भविष्य बरबाद करून टाकेन, अशीही धमकी दिल्याचं पीडितने पोलिसांना सांगितलं.
एवढंच नव्हे पुढे तर हद्दच झाली, जेव्हा आरोपीने त्या तरूणीचे एडिट केलेले अश्लील फोटो, तिच्या वडिलांच्या फोनवर पाठवले. यामुळे संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसला. बदनामी होईल या भीतीने आधी सगळे जण गप्प होते, पण दिवसेंदिवस आरोपीच्या धमक्या वाढू लागल्या, तेव्हा त्याच पीडित तरूणीने कशीबशी हिंमत गोळा करत पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
हुंड्याबद्दलही आरोप
लग्नाच्या वेळी पुरेसा हुंडा नसल्याचे कारण देत आरोपी मेहुणा आता 50 हजार रुपये मागत आहे. पैसे दिले नाही तर कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवे अशी धमकीही तो देत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. जेव्हा तरुणीने तिच्या बहिणीला याबद्दल सांगितले तेव्हा आरोपी संतापला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला. तिने विरोध केला तेव्हा त्याने तिच्या पालकांनाही शिवीगाळ केली.
यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड घाबरलं असून ते दहशतीखाली आहेत. आरोपी खतरनाक असून सतत धमक्या देतोय असे म्हणत त्यांनी पोलिसांकडून मदतीची, न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल असंही आश्वासन पोलिसांनी कुटुंबाला दिलं आहे.
